किलोला शेकडो रुपयांचा भाव मिळवत तरुणाने सफेद जांभळांची शेतीचा प्रयोग केला यशस्वी

जांभूळ हे तसं सर्वांचेच आवडीचे फळ.आरोग्यासाठी तर अतिशय गुणकारी औषध म्हणून जांभूळ (jambhul)या फळाची ओळख आहे. आपल्याला माहीत आहे की, जांभूळ या फळाला उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतु मध्ये प्रचंड मागणी असते. आपण आतापर्यंत काळ्या रंगाचीच जांभळं पाहिली आणि खाल्ली असतील. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील एका तरूणानं चक्क सफेद जांभळाची लागवड केली आहे. या जांभळांना मार्केटमध्ये चांगली मागणी असून तरुणाने चांगली कमाई करत आहे. चला तर मग जाणून घेऊ त्याचा प्रेरणादायी प्रवास

२०१९ मध्ये केली झाडांची लागवड

विक्रांत काळे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव ते अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये सफेद जांभळांची लागवड केली. विक्रांत हे एकदा मित्रांसोबत चर्चा करत असताना थायलंडच्या सफेद जांभुळाच्या जातीची माहिती मिळाली. आणि आपल्याकडे सुद्धा हे जांभूळ असावे असे त्यांना वाटू लागले. नंतर मित्राच्याच मदतीने सफेद जांभळांची रोपे मागवून त्यांची लागवड केली.

एक एकर शेतात केली लागवड

विक्रांत यांची एकूण 40 एकर शेती आहे. त्यात त्यांनी आंबा, पेरु, फणस, अशा विविध फळांच्या वेगवेगळ्या जातींची लागवड केली आहे. त्यापैकी एक एकर क्षेत्रात 12 बाय 15 फुटांवर सफेद जांभळाची लागवड केली आहे. जून 2019 मध्ये लागवड झालेल्या या बागेतून लागवडीनंतर तिसर्‍याच वर्षी फळे यायला सुरुवात झाली. त्यामुळे सध्या काळे यांची ही बाग चार वर्षांची असून फळांची संख्या देखील चांगली आहे असून त्यांना किलोमागे ८०० रु प्रती दर मिळत आहे.

बागेचे व्यवस्थापन कसं केलं ?

सफेद जांभूळ झाडांना नोव्हेंबर पासून ते डिसेंबरपर्यंत पाण्याचा ताण दिला जातो. त्यानंतर जानेवारी मध्ये खते तसेच सॅंड फिल्टर मधून स्वच्छ केलेले पाणी झाडांच्या खोडाजवळ दोन्ही बाजूने एक एक ठिबक नळी द्वारे दिले जाते. ज्यातून पुढे मार्च मध्ये उत्तम फूल धारणा होत त्यापासून अपेक्षित फळांचे उत्पादन लक्ष साधले जाते. असं विक्रांत काळे यांनी सांगितले आहे.

सफेद जांभळाची वैशिष्ट्ये काय ?

सफेद जांभूळ हे चवीला काळ्या जांभळाच्या तुलनेत अधिक चांगले असल्याने लोक त्याची आवडीने खरेदी करतात. तसेच पारंपरिक काळे जांभूळ बाजारात येण्यापूर्वीच सफेद जांभूळ मिळत असल्याने या सफेद जांभळांना बाजारात मागणी अधिक असते. पावसाळ्यापूर्वीच म्हणजेच एप्रिलपासून सफेद जांभळाच्या झाडांना फळे लागत असल्याने पावसाच्या वार्‍यात फळगळ होण्याची भिती या झाडांना नसते. त्याचबरोबर झाडांची ऊंची कमी असल्याने फळांची तोड करणे देखील सहज शक्य होते.

हेही वाचा :

‘नीटयूजी’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे स्पष्ट संकेत बिहारचा केंद्र सरकारकडे अहवाल सादर

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, मॅच कॅन्सल झाल्यास फायदा कुणाला?

पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी रद्द; अधीक्षकांनी दिली नवी तारीख