सांगली लोकसभेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये(believe) चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन बोलताना संजय राऊतांवर इशारा दिला होता. त्यावर राऊतांनीही विश्वजित कदम खरे वाघ आहेत का? हे निकालानंतर समजेल, असा टोला लगावला होता. संजय राऊत यांच्या या विधानावरुन आता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
“विश्वजीत कदम हे वाघच आहेत, आणि संजय राऊतांना वाघ बाहेर(believe) कसे शिकार करतो हे कदाचित माहीत नसावं ,त्यांनी एखाद्या चॅनलची डॉक्युमेंटरी बघावी, कारण वाघ संधी बघून झडप घालतात, असा टोला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी राऊतांना लगावला आहे. तसेच संजय राऊत गेले महिनाभर काय बोलतात, का बोलतात ? याचा उलगडा निवडणूक झाल्यावर होईल..” असे विशाल पाटील म्हणाले.
तसेच “विश्वजीत कदम हे काँग्रेसचे भविष्य आहेत, पण विश्वजित कदम यांना नाहक बदनाम करण्याचे आणि घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देखील विशाल पाटलांनी केला आहे. त्याचबरोबर सांगली लोकसभेत वारं फिरलं नाही तर वाऱ्याचे आता वादळ झाले,” त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील विशाल पाटलांनी व्यक्त केला आहे.
तसेच “यंदाची निवडणुक ही वेगळी आहे. प्रचार करणे सोपे झाले आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे मोठा पाठिंबा मला मिळालेला आहे. आघाडी धर्मात बिघाडी ही संजय राऊतांकडूनच झाली. सांगलीची जागा सुटली नसताना परस्पर उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाने माझ्यावर कारवाई करु नये, करणार नाही…” असेही विशाल पाटील म्हणाले.
हेही वाचा :
कोल्हापूर-हातकणंगलेत प्रतिष्ठा पणाला, शिंदे मतदारसंघात तळ ठोकून
कोण गरजले, कोण बरसले कोणाचे नेमके कुठे बिनसले?.
मिसळ पे चर्चा’ अन् काँग्रेसच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल; काल्हापुरात काय घडलं?