सर्वच मतदारसंघांत गोंधळ घातलात, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ कसे घेणार!

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात प्रचंड गोंधळ घालणारा निवडणूक आयोग आणि पेंद्र सरकार (govt)‘वन नेशन, वन इलेक्शन’ कसे घेणार, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला झापले. एक निवडणूक नीट घेऊ न शकणाऱयांनी अशी बढाई मारू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबईत आज झालेल्या सहा लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी निवडणूक आयोगाचे नियोजन सपशेल फसल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. मतदान पेंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या असताना मतदार राजा भरउन्हात उभा होता. यामुळे काहींना चक्करही आली. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगही भरउन्हात तासन् तास ताटकळत उभे होते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्येही बिघाड झाल्याने मतदान खोळंबले. याचा मनस्तापही मतदारांना झाला.(govt)
कधी वोटिंग मशीन बंद, कधी ओळखपत्राचा गोंधळ तर प्रचंड गैरसोयीमुळे अनेकांना मतदान पेंद्रावर येऊनही केवळ ढिसाळ नियोजनामुळे मतदान न करताच माघारी परतावे लागले. अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक मतदान रखडवले जात असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तुमच्या ढिसाळ नियोजनामुळेच आम्ही मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्कापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त केल्याचेही त्यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.

गैरसोय, गोंधळाची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची

भरउन्हात लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत असताना मतदार राजासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली नाही. तुम्ही सेलिब्रिटींना घेऊन मतदान करण्याचे आवाहन करता, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा देत नाहीत. आम्हीदेखील मतदारांना नियमांच्या बंधनांमुळे सुविधा देऊ शकत नव्हतो. त्यामुळे हा गोंधळ आणि गैरसोयींची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा :

गौतमी पाटीलच्या नवीन VIDEO तील अदांनी चाहत्यांना लावलं वेड

लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघाती मृत्यू

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना ‘या’ नावानं मारतात हाक