किल्ल्यावर एकही अतिक्रमण राहणार नाही; शिवजयंतीला मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवनेरीवरुन शब्द

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political updates) हे किल्ल्यावर दाखल झाले आहेत.

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना वाहिली. त्याचबरोबर पाळणा म्हणून शिवजयंती उत्साहामध्ये साजरी केली. यावेळी तरुणांची मोठी गर्दी किल्ल्यावर दिसून येत आहे. शिवनेरी किल्ल्यावर फुलांची आरास आणि सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रांगळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शिवनेरीवर फडणवीस म्हणाले की, “जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आजपासून पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा ४००वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. शिवनेरीवर आल्यावर आपल्याला जी स्वराज्याची स्फूर्ती मिळते ते घेऊन महाराष्ट्राची(political updates) सेवा करण्यासाठी आम्ही सर्व लोक येथे येत असतो,” अशा भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्य आहेत.

पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते तर एक चांगले प्रशासक देखील होते. आम्ही त्यांच्या सर्व किल्ल्यांचा विकास करू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केली आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे,” असेही मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “स्वराज्याची राजधानी रायगड येथे अनेक कामे आपण सुरू केले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतला आहे. काही झालं तरी अतिक्रमणं तिथं राहाणार नाहीत,” अशा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरीवर दिला आहे.”आम्ही शासक नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत…!” दार्‍या घाटापासून शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत सर्व मुद्दे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू,” असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टवर केले आहे.

हेही वाचा :

घरीच तयार करा तीन प्रकारच्या चवदार ढाबा-स्टाईल डाळींच्या डिशेस

खेळाडू्ंसाठी गुडन्यूज! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI ने केली मोठी घोषणा

जितेंद्र आव्हाडांना प्रचंड मोठा धक्का, दोन कट्टर समर्थकांनी सोडली साथ