राहुल गांधींवर फिदा होती ‘ही’ अभिनेत्री! स्वतःच सांगितलं, ‘मी त्यांचे फोटो

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खान ही तिच्या (personal)अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. सैफ अली खानसोबत विवाहबंधनात अडकलेली करिना, एकेकाळी मात्र देशातील प्रसिद्ध राजकारणी राहुल गांधी यांच्या प्रेमात असल्याचा कबुलीजबाब तिने दिला होता. तिच्या या वक्तव्याने त्या काळात मोठी चर्चा रंगली होती.करिना कपूरने एका जुन्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्याविषयी आपली इच्छा व्यक्त केली होती. ती एका शोमध्ये म्हणाली होती की, “मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल. मी त्यांचे फोटो पाहत राहते. त्यांना ओळखणं फार रंजक ठरेल. मी चित्रपट कुटुंबातून आहे आणि ते राजकीय घराण्यातून येतात. त्यामुळे आमच्यात चांगली चर्चा होईल.”

“ते फक्त प्रसिद्ध आडनावांमुळे बोलले गेले!” :
करिनाच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र नंतर जेव्हा तिला याबाबत पुन्हा विचारले गेले तेव्हा तिने सांगितले, “ते खूप जुने आहे… आणि मी ते फक्त आमच्या (personal)आडनावांमुळे बोलले होते.” अशा प्रकारे करिनाने त्या वक्तव्यावर थोडक्यात स्पष्टीकरण दिलं.करिनाने याआधी अभिनेता शाहिद कपूरला अनेक वर्षे डेट केलं होतं. त्यानंतर ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खानसोबत तिचं प्रेम जुळलं आणि दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. सध्या त्या दोघांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.

करिना कपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ‘कभी खुशी कभी गम’, ‘जब वी मेट’, ‘हिरोईन’, ‘टशन’, ‘वीरे दी वेडिंग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिची भूमिका विशेष गाजली. ती नुकतीच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात झळकली होती.करिना केवळ (personal)अभिनयच नव्हे, तर तिच्या शैली, वक्तव्य आणि व्यक्तिमत्त्वामुळे देखील बॉलिवूडमध्ये कायम चर्चेचा विषय राहिली आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर :विशाळगडावर नेऊन मित्राचा चिरला गळा अन् दरीत फेकला मृतदेह

उन्हाळ्यात थंड जारमधील पाणी पिताय? आताच सावध व्हा! नाहीतर…

‘रेखा फक्त पैसे न देणाऱ्यांसोबत.. राकेश रोशन यांनी उघड केला खरा चेहरा