एकदा तुमच्या भावाचा आणि 2019 ला तुमचा पराभव मी केला होता. यावेळीही तुमचा मोठ्या(political advertising) फरकाने पराभव करुन हॅट्रिक करणारच असं आव्हान सांगली लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटलांना दिलं आहे. विशाल पाटील हे सांगली लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवत आहे. त्यांच्यावर संजयकाका पाटील यांनी जोरदार टीका केली. सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय लागली आहे, त्यांनी आमच्यासारख्यांची माप काढू नयेत असंही पाटील म्हणाले.
मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान मी विशाल पाटील(political advertising) यांना आधीच दिले आहे. विशाल आता पुन्हा मैदानात आलेले आहेत. आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे, पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल असंही पाटील म्हणाले. सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय लागली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माप काढू नयेत. या माणसाने अनेक सहकारातील संस्था बंद पाडल्या.
साखर कारखाने, प्रकाश अॅग्रो, वसंतदादा दूध संघ, सोनी कारखाना, शाबू प्रकल्प, यासह आठ प्रकल्प बंद पाडले आहेत. यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही संजयकाका पाटील यांनी विशाल पाटलांवर केला. सामान्य माणसाला अडचणीत आणून उध्दवस्त केले आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांना सहकारी संस्थेवरच जगायची सवय आहे, त्यांनी आमची मापे काढू नये, मी खमका माणूस असल्याचे संजयकाका पाटील म्हणाले.
सांगली लोकसभेत एकदा तुमच्या भावाला आणि एकदा तुमचा पराभव केला आहे. यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करुन हॅट्रिक करणारच असे म्हणत संजयकाका गुंडगिरी करतो की लोकांना दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांना माहित असल्याचे ते म्हणाले. विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे.
या चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केलेल्या आरोपावर मात्र संजयकाकांनी सावधपणे भूमिका मांडली. चंद्रहार बोललेत म्हणजे त्यांना संजय राऊत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून काही मेसेज आले असतील. विशालने काय भानगडी केल्या, काय नाही याबाबत दोन चार दिवसांमध्ये हळूहळू हेच पैलवान आपणाला बऱ्याचशा गोष्टी सांगतील असेही संजयकाका पाटील म्हणाले.
हेही वाचा :
PM मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल, अडचणी वाढणार?
लतादीदींचा स्वर म्हणजे आत्मा-परमात्म्याला जोडणारी तार!
मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं?