हिंदू पंचांगानुसार,आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. हिंदू (Hindu) धर्मात आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास हा गणपतीला समर्पित केला जातो. या दिवशी विधिपूर्वक बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे.
असं म्हणतात की, ज्या व्यक्तीवर श्री गणेशाची कृपा आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात तसेच त्या भाविकाच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात. यासाठीच आज अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही खास उपाय केले जातात. हे उपाय केल्याने तुमच्या घरात सुख-शांती, समृद्धी नांदते. हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
अंगारक संकष्ट चतुर्थी 2024 शुभ मुहूर्तआज कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आजच्या दिवशीचा शुभ मुहूर्त पहाटे 1.23 वाजता सुरु झाला असून तो रात्री 11.10 वाजेपर्यंत असणार आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी उपाय
- जर तुम्ही वर्षभर मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर तुम्ही श्री गणेशाची आराधना करू शकता. यासाठी तुम्ही ‘श्री गणेशाय नम:’ या मंत्राचा 11 वेळा जप करा.
- तसेच, जर तुम्हाला तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढवायची असेल तर तुम्ही आजच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करू शकता. तुम्ही बुधवारी देखील हा उपाय करू शकता यामुळे तुमच्या घरात संपत्ती टिकून राहील.
- जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही भगवान गणेशाला दुर्वा फार आवडतो. तुम्ही यासाठी 11 दुर्वा गाठी गणेशाला अर्पण करू शकता. यामुळे व्यवसायात तुमचं नुकसान होणार नाही.
- शेवटचं म्हणजे जर तुम्हाला तुमची सर्व कामे कोणत्याही अडचणीशिवाय, अडथळ्याशिवाय पूर्व व्हावीत असं जर वाटत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी गणपतीची पूजा करण्याबरोबरच गणेशाचा 11 वेळा जप करा.
हेही वाचा :
NIA मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; किती मिळेल पगार..
25 जूनपासून जोरदार बरसणार, राज्यात यावर्षी जास्त पावसाचा अंदाज आहे