‘या’ राशींच्या आयुष्यात बदल घडण्याचे संकेत

मेष
राशीत असलेल्या राहू मुळे मेष व्यक्ती काहीसे अहंकारी होतील. मन विचलित राहील.शिव आराधना करावी. दशम स्थानातील शनि कार्यक्षेत्रात अनेक संधी , उपलब्ध करून देण्यात मदत करतील. शुक्र संतती बाबत उच्च फळ देईल. (taurus love horoscope) गुरू धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आणेल . सप्तम केतू जोडीदाराच्या प्रकृती विषयी आशंका निर्माण करेल परदेश संबंधी कागदपत्र बनतील..एकूण आठवडा हा मीन चंद्र प्रवेशातून लाभ देणारा ठरेल.

वृषभ
राशीच्या व्यय स्थानात राहू व षष्ठ केतू आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल . रवि बुध गृह लाभ मिळवून देईल. भावंडांचे सुख मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी व्यक्ती त्रासदायक ठरू शकते. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. अधिकारी व्यक्तीची भेट होईल . सप्ताह उत्तम फळ देणारा ठरेल .

मिथुन
सूर्य बुध भ्रमण कन्या राशीत झाले आहे. अतिशय शुभ असा हा बदल आहे .पंचम केतू संतती संबंधी वार्ता देईल. नवीन कला शिकण्याची इच्छा होईल. दशमातील गुरू परदेश प्रवास,धार्मिक व भाग्यकारक घटना घडवून आणेल .गुरू महाराज अधिकार प्राप्ती करून देतील. फक्त सावध रहा. सप्ताह उत्तम जाईल.

कर्क
रवि बुध कार्य स्थळ, किंवा घरात बदल घडवून आणेल . एखादी (taurus love horoscope) नवीन व्यक्ती अडथळे आणेल. भाग्यातील गुरू शुभ असून वडिलांकडून लाभ देइल. प्रवास योग आनंद देतील . शनि मकर राशित वक्री आहे. गुरू शुभ संकेत घेऊन येईल. जोडीदाराची काळजी घ्या. चंद्र भ्रमण घरामध्ये काही विशेष घटना घडवेल. सप्ताह शुभ.

 

taurus love horoscope

सिंह
राशी स्वामी रवि बुधा सोबत धन स्थानात येणार असून राज योग होत आहे. आर्थिक लाभ होतील .पोटाचे त्रास होऊ शकतात. चंद्र भ्रमण शुभ असून जवळ पास प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात काही बदल संभवतात . जोडीदाराला काही मोठे लाभ होऊ शकतात. लवकरच आयुष्यात बदल घडण्याचे संकेत आहेत. कार्य क्षेत्रात काम करत रहाल . सप्ताह शुभ.

कन्या
हा सप्ताह सर्व दृष्टीने संथ आणि काही विशेष ना घडता जाईल.रोजची काम कंटाळवाणी वाटतील.आर्थिक दृष्ट्या मात्र आठवडा चांगला जाईल.जवळपास फिरायला जाण्याचे योग येतील.संतती ही तुमची प्राथमिकता असेल सप्तम गुरू तुम्हाला विवाह योग आणेल. चर्चा होईल.विजय तुमचाच होणार आहे. काळजी घ्या.सप्ताह अनुकूल.

तुला
षष्ठ स्थानातील गुरू प्रवास,घरासाठी काही खर्च असा योग आणेल. अविवाहित व्यक्तींना आकर्षक व्यक्ती भेटेल.संतती सुख मिळेल. राशीतील केतू स्वभावात बदल घडवेल . आई वडिलां च्या प्रकृतीची काळजी घ्या.त्यांना वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी घर आणि वाहन यासंबंधी नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक दृष्ट्या सप्ताह अनुकूल राहील.

वृश्चिक
षष्ठ राहू आणि व्यय केतू गोचर परदेश संबंधी घडामोडी घडतील. संतती सुख लाभेल.वैवाहिक सुखाच्या दृष्टीने आता काळ बरा आहे.नवीन घर , वाहन यासंबंधी लौकर निर्णय घ्या.काहीही अनावश्यक खर्च करू नका. चंद्र भ्रमण पंचम स्थानात आहे. मुलांची काळजी घ्या. सप्ताह मध्यम.

धनु
या आठवड्यात गेल्या काही दिवसापासून जाणवत असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल पण अनेक मार्गांनी पैसा येईल. चतुर्थ गुरू , सूर्य बुध शुभ असून आर्थिक वाढ करतील. पराक्रम आणि चिकाटीने तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवाल. सप्ताहात अनेक शुभ फल मिळतील.

मकर
चतुर्थ स्थानात आलेला राहू हा स्थान परिवर्तन ,घरामध्ये मोठे बदल करण्यासाठी अनुकूल आहे .रवि बुध नवीन अधिकारी व्यक्तीची भेट घडवेल.महत्वाचे फोन ,निरोप येतील. वाणी तेजस्वी होईल.शनि प्रकोप आता काहीसा कमी होईल. आर्थिक लाभ,कुटुंबात वाढ संभवते. सप्ताह आनंदी जाईल.

कुंभ
तृतीय राहू आणि भाग्यात केतू तुम्हाला पराक्रमी बनवेल .भावंडांशी संबंध ताणले जातील.धार्मिक आस्था वाढतील . राशीचे धन स्थानातील गुरू स्वभावात सौम्यता आणील.. अष्टम स्थानात येणारा बुध काही घटनांचे संकेत देईल.आर्थिक लाभ होतील. प्रकृतीचे त्रास जाणवतील. जपून रहा. सप्ताह मिश्र फळ देईल.

मीन
राशी स्वामी गुरू उदित आहे .एकूण शरीर तेजस्वी होईल. सूर्य बुध डोळ्याची काळजी घ्या,अधिकारी व्यक्तींना नाराज करू नका असे सुचवीत आहे. सध्याचा काळ हा बदलांचा आहे.कुठलेही निर्णय घाईने घेऊ नका . विशेषतः नोकरी संबंधी सावध रहा.आर्थिक स्थिती ठीक राहील एकूण सप्ताह मध्यम जाईल.

Smart News :