बाप-लेकीची भावस्पर्श कथा

महंमद अली जिना यांच्या आयुष्यावर (life)आलेल्या पुस्तकांत त्यांचे राजकीय व सार्वजनिक आयुष्य समोर येते. मात्र ‘जिना व दिना – एक संघर्षमय कहाणी’मधून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश पडतो.


भारताच्या फाळणीचे व प्रकर्षाने पाकिस्तानचे जनक ठरलेले बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी आपल्या जीवनात सर्वोच्च राजकीय ध्येय गाठले. मात्र, त्यांचे वैयक्तिक आयुष्य(life) दुःखाने भरलेले होते. मुंबईतील त्या वेळचे सर्वात श्रीमंत पारशी उद्योगपती सर दिनशॉ पेटिट यांची एकुलती एक मुलगी, जेआरडी टाटा यांची भाची असलेल्या रतनबाई ऊर्फ रुट्टी पेटिट जिना यांच्या प्रेमात पडल्या.

घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी जिना यांच्यासोबत लग्न केले. दोघांची प्रेमाची कथा एका परिकथेसारखी भासत असली तरी त्याचा अंत दुःखद होता. जिना यांच्या एकुलत्या एक मुलीने १९३८ मध्ये आपल्या आईप्रमाणे बंडखोरी करून पारशी उद्योगपती नेविल वाडिया यांच्याशी लग्न केले. एक राष्ट्र जन्माला घालणाऱ्या बापाच्या मुलीने पाकिस्तानला आपले राष्ट्र म्हणून स्वीकारले नाही.

असेही म्हटले जाते, की पत्नीचा मृत्यू आणि मुलीचे लग्न अशा दोन घटनांनी जिना यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. एवढा की, धर्मनिरपेक्ष विचारांचे जिना पुढे कडवे आणि धार्मिक होत गेले. जिना एकाकी पडले. बहीण फातिमा हिच्याशिवाय त्यांचे कुणीच नव्हते. त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ १३ महिन्यांतच जिना यांचा मृत्यू झाला. शेवटच्या वेळी आपली एकुलती एक मुलगी आपल्यासोबत नव्हती याची त्यांना खंत होती.

बॅरिस्टर जिना बाहेरून कितीही रुक्ष, कठोर वाटत असले तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात पत्नी, मुलीविषयी उत्कट प्रेम होते. असेही म्हटले जाते, की जिना आपल्या आयुष्यात दोनदा सार्वजनिकरीत्या रडले. एकदा, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा आणि दुसऱ्यांदा, त्यांच्या मुलीने मनाविरुद्ध लग्न केले तेव्हा. जिना यांच्या आयुष्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत गेल्या.

त्यांचे जीवन एवढे धावपळीचे, विलक्षण घटनांनी भरलेले होते की एक तर त्यांना प्रेम व्यक्त करायलाही फार वेळ मिळाला नाही किंवा मुस्लिम जगत काय म्हणेल म्हणून कधी ते सार्वजनिकरीत्या व्यक्तच होऊ शकले नसावेत. जिना यांची एकुलती एक लेक दिना हिचे वडिलांवर खूप प्रेम होते. मात्र, आईप्रमाणे दिनाचे जीवनही अधांतरी होते. पाकिस्तानच्या जन्मदात्याच्या या मुलीला ना भारताने स्वीकारले ना पाकिस्तानने… अशाच विमनस्क अवस्थेत भारत-पाकिस्तानापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या न्यूयॉर्कमध्ये दिना एकाकीपणे जग सोडून गेली.

‘जिना व दिना – एक संघर्षमय कहाणी’ या कादंबरीतून बाप-लेकीची भावस्पर्शी कथा मांडण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश सतीश चौधरी यांनी ती लिहिली आहे. त्यांची ही पहिलीच कादंबरी. या कादंबरीच्या जन्माची कथाही तेवढीच विशेष आहे. २०१७ मध्ये दिना वाडिया यांच्या मृत्यूनंतर ‘सकाळ’सह दोन वर्तमानपत्रांत त्यांच्या आयुष्यावर विस्तृत लेख प्रकाशित झाला. तो लेख वाचून लेखकाच्या मनात त्याबद्दलचे कुतूहल जागे झाले.

हेही वाचा :

अमोल कोल्हेंचा भाजपला दे धक्का; ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश!

नाना पटोले यांच्या कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट; ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये ‘हाच’ संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?