कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ मधून तृप्ती डिमरीचा पत्ता कट

बॉलिवूडच्या चाहत्यांना सध्या ‘आशिकी 3’ चित्रपटाची(new movie) प्रतीक्षा आहे. या आशिकी आणि आशिकी 2 चित्रपट सुपरहिट ठरले होते. 1990 मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. या चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. त्यानंतर 2013 मध्ये या चित्रपटाच्या सीक्लेललाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.

यातील श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरची केमिस्ट्री सुपरहिट ठरली. आता प्रेक्षक आशिकी 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अनुराग बासू दिग्दर्शित आशिकी 3 चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आशिकी 3 (new movie) मध्ये कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांच्यातील प्रेम पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. पण आता ही जोडी पडद्यावर मजा करताना दिसणार नाही. आर्यन आणि तृप्ती डिमरी यांची अनुराग बसूच्या आशिकी 3 मध्ये मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. तथापि, मीडिया सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत आहेत, त्यानुसार आशिकी 3 प्रकल्पात मोठे बदल केले जात आहेत. तर तृप्ती डिमरी आता या चित्रपटापासून दूर जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीला विलंब होत आहे.

मिड-डेच्या वृत्तानुसार, आशिकी 3 मध्ये तृप्ती डिमरीच्या नावाची चर्चा सुरु झाल्यापासून चाहते खूप उत्सुक होते. पण, आता ती या प्रोजेक्टमधून बाहेर पडली आहे. पण, यामागचं कारण काय याबाबतचा सस्पेंस अद्यापही कायम आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यनची केमिस्ट्री आणि रोमान्ससाठी खूप उत्साहित होती, पण आता हे एकत्र दिसणार नाही. याशिवाय हा चित्रपटाच्या नावाशी संबंधित वादही सुरु आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या पुढे ढकलण्यात आला आहे.” दरम्यान, निर्मात्यांनी अद्याप काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, आशिकी 3 चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसेल, असं बोललं जात होतं. मात्र, आता या चित्रपटातून तिचं नाव वगळण्यात आल्याची माहिती आहे. आता कार्तिक आर्यनसोबत मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. याशिवाय आशिकी 3 चित्रपटाचं नावही अद्याप कन्फर्म झालेलं नाही, कारण या नावासंबंधित वाद सुरु आहे. अशा अनेक कारणांमुळे सध्या हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.

अनुराग बासू दिग्दर्शित कार्तिक आर्यनच्या रोमँटिक चित्रपटाचं शुटिंग जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला मुंबईमधील शूटिंग करण्यात येईल, त्यानंतर इतर लोकेशनचं शेड्युल असेल. सध्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीची कास्टिंग सुरू आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

फ्लॅट रंगविण्यासाठी आला अन् चुना लावून गेला, अभिनेत्रीच्या  घरी लाखोंची चोरी

संकटाच्या वेळी चाणक्याच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, मोठ्या अडचणीतूनही होईल सुटका

आर्मी SSC टेक एन्ट्री २०२५ साठी अर्ज प्रक्रिया सुरु; ऑनलाईन करता येणार अर्ज