निरोगी राहण्‍यासाठी ‘हे’ पदार्थ टाळाच..!

आपल्‍याकडे पूर्वी डोळ्यावर चष्‍मा आला की, चाळीशी ओलांडली असे मानले जात होते. मात्र आता (healthy) जीवनशैली बदलाचा परिणाम आल्‍या जगण्‍यावर एवढा झाला आहे की, चष्‍मा आणि वय हे पूर्वीचे समीकरण राहिलं नाही. जगण्‍याचा वेग एवढा वाढला आहे की, आजरी पडेपर्यंत आपण आपल्‍या शरीराकडे लक्षच देत नाही. मात्र आता बदलत्‍या जीवनशैलीमुळे चाळीशी ओलांडली की, आरोग्‍याकडे लक्ष देणे आवश्‍यक ठरते. वयाची चाळीशी ओलांडल्‍यानंतर घेतलेल्‍या काळजीमुळे वृद्धापकाळ सुखकर होतो. निरोगी राहायचे असेल तर सर्वप्रथम आपल्‍याला आहाराकडे लक्ष द्‍यावे लागते. खाण्‍याच्‍या चुकीच्‍या सवयींमध्‍ये बदल करावे लागतात. चला तर मग जाणून घेवूया चाळीशीनंतर कोणते खाद्‍यपदार्थ टाळावेत ते….

चाळीशीनंतर चयापचय क्रियेत बदल होतो. तसेच हार्मोन्‍सही बदल हाेत असताे. विशेषत: रजोनिवृत्तीतून जात असलेल्‍या स्त्रियांना याला सामोरे जावे लागते. तर पुरुषांच्‍याही स्‍नायूंच्‍या पेशीचे कार्य मंदावण्‍याची प्रक्रीया सुरु हाेते. त्‍यामुळे निरोगी राहण्‍यासाठी आहारातून काही पदार्थ टाळणे महत्त्‍वाचे ठरते. कारण आहाराच्‍या चुकीच्‍या सवयींमुळे तुमचे संपूर्ण आरोग्‍य बिघडू शकते. आता तुम्‍ही आहारात कोणते पदार्थ टाळावेत याची यादी मोठी आहे. मात्र याचे पालन केल्‍यास भविष्‍यात होणार्‍या आरोग्‍याच्‍या अनेक समस्‍यांपासून तुमची सुटका होईल. तसेच गंभीर आजारापासूनही तुमचा बचाव होण्‍यास मदत होईल. निरोगी आरोग्‍यासाठी खालील पदार्थ आहारातून हद्‍दपार करा.(healthy)

मागील काही वर्षांमध्‍ये आपल्‍या आहारात गोड पदार्थांचा समावेश अधिक आहे. आहारातील साखरेचे वाढत्‍या प्रमाणामुळे मागील काही वर्षात अनेक नवे विकार वाढले. त्‍यामुळेच साखरेला आधुनिक काळातील विष मानले जावू लागले. त्‍यामुळे कृत्रिम गोड पदार्थाकडे वळू लागले. मात्र हे पदार्थही सामान्‍य साखरेसारखीच आरोग्‍यास हानीकारक असल्‍याचे, अभ्‍यासात स्‍पष्‍ट झाले आहे.

कृत्रिम साखरेमुळे मधुमेह व अन्‍य आरोग्‍य समस्‍या निर्माण होतात. त्‍यामुळे साखर आणि कृत्रिम गोड पदार्थांना आपल्‍या आहारातून हद्‍दपार करा. तुम्‍हाला गोड पदार्थाच आवडत असतील तर नैसर्गिक पर्याय असणारा मध घ्‍या. त्‍यामध्‍ये अनेक पोषक घटक असतात.

साखर आणि मीठ
साखरेचा आरोग्‍यावर होणार दुष्‍परिणामांची सर्वांनाच माहिती आहे. साखर आणि मीठ या दोन्‍ही पदार्थांचा तुमच्‍या शरीरातील पेशींवर सारखाच परिणाम होता. तुम्‍हाला निरोगी राहायचे असेल तर साखर आणि मीठ याचा अतिरिक्‍त वापर टाळा. तसेच चवीपुरते मीठ हा शब्‍द प्रयाेगाचा वापर मुलांचाही आहारात करा.

खालील पदार्थांपासून दूर रहा…
अति भाजलेले, खारवलेले आणि वाळवलेले मांस
व्‍हीप्‍ड क्रीम असणारे पदार्थ
प्रक्रिया केलेले पॅकबंद पदार्थ
तळलेले विविध पदार्थ
कोल्ड्रिंक्स
डाएट सोडा
मिल्‍कशेक
साखरेचे प्रमाण अधिक असणारा ब्रेड
फ्रेंच फ्राईज
लाल मांस
साखर आणि फॅफिनयुक्‍त एनर्जी ड्रिंक्‍स
सोडा आणि कोला
रंगं असणारे अन्‍नपदार्थ
बाटलीमधील तयार फळांचा रस
फास्‍ट फूड

हेही वाचा :


शिरोळ तालुका पुन्हा एकदा महापुराच्या विळख्यात जाण्याची भीती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *