धनंजय मुंडेंना बलात्काराची तक्रार नोंदविण्याची धमकी!

एका महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  यांना दिली. तसेच त्यांच्या ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही महिला इंदूरची असून मुंबईतील पोलिस ठाण्यात (Mumbai Police) महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यानंतर महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी धनंजय मुंडेंना दिली. तसेच त्यांना ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. ५ कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, असा तगादा आरोपी महिलेने मुंडेंकडे लावला. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.

आरोपी महिलेविरोधात (Mumbai Police) पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा :


मुंबई विरूद्धच्या मॅचपूर्वी CSK चा खेळाडू मायदेशी रवाना!

Leave a Reply

Your email address will not be published.