अत्यंत धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न!

दोन तरुणींमध्ये शुल्लक कारणांवरुन वाद झाल्यामुळे रागाच्या भरात दोघींपैकी एका तरुणीने (वय- १८ वर्षे) विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तिच्या सोबत वाद घालणाऱ्या दुसऱ्या विवाहित तरुणीने देखील विष प्राशन केले. त्यानंतर लागलीच या दोघींनाही ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याची माहिती तिच्या पतीला मिळताच त्याने रुग्णालय गाठले अन् आपल्या पत्नीला पाहून त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गायरण येथील. या संदर्भात पोलीस अधिक तपास (crime invistigation) करत आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गायरण येथील रहिवासी असलेले गणेश चव्हाण यांच्याकडे पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, जवळील नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आले. हे आमंत्रण आकोट-दर्यापूर रस्त्यावरील ग्राम पिंपळोद येथील रहिवासी हिरालाल चव्हाण यांनाही देण्यात आले.(crime invistigation)

त्यानंतर पूजेच्या कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजेच, १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गणेश चव्हाण यांची मुलगी शितल आणि हिरालाल चव्हाण यांची पत्नी मनिषा चव्हाण यांच्यात अगदी शुल्लक कारणावरून वाद होऊन चांगलीच बाचाबाची झाली. याचा राग अनावर झाल्याने शितलने घरातील फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे पाहून उपस्थित असलेली २० वर्षीय विवाहित तरुणी मनीषा चव्हाण हिने देखील संपूर्ण प्रकरण आपल्या भोवती येणार, या भीतीपोटी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यानंतर लागलीच नातेवाईकांनी या दोघींनाही उपचारार्थ मुर्तीजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याची माहिती तिच्या पतीला (हीरालाल चव्हाण, वय २५.) मिळताच त्याने रुग्णालय गाठले, अन् आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहून त्यानेही रुग्णालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सद्यस्थितीत या तिघांवर पुढील उपचारासाठी अकोल्यात दाखल केले आहे. शहरातील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चांगली आहे.

तिघेही एकाच कुटुंबातील

सिरसो गायरान पारधी नगरात राहणाऱ्या शितल गणेश चव्हाण (वय १८), मनिषा हिरालाल चव्हाण (वय २०) हिरालाल गोपाल चव्हाण (२५) असे आत्महत्या प्रयत्न करणाऱ्यांची नावे असून तिघेही एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. या तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? आणि त्या दोघांच्या वादाची नेमकी कारणे काय होती? यासंदर्भात पोलिस पुढील तपास करणार आहेत. या घटनेची नोंद शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे.

हेही वाचा :


धनंजय मुंडेंना बलात्काराची तक्रार नोंदविण्याची धमकी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *