दारू पिऊन वाहन चालवणं रोखता येणार; ‘या’ भन्नाट उपकरणामुळे बसणार चाप

Traffic rules

रस्त्यावरून वाहन चालवत असताना, वाहतुकीच्या नियमांचं (Traffic rules) पालन करणं आवश्यक आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं अपघात झाल्याचं आपण अनेकदा पाहतो, ऐकतो.

मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत; मात्र भविष्यकाळात असे प्रकार नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. कारण धनबादमधल्या तीन अभियंत्यांनी या समस्येवर अनोखा उपाय शोधून काढला आहे. या अभियंत्यांनी असं उपकरण (Device) विकसित केलं आहे, जे मद्यपींना (Alcoholic) गाडी चालवण्यापासून रोखू शकणार आहे. यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

`झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त दिलं आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे भीषण अपघात (Accident) होतात. प्रसंगी अशा अपघातात निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागतात. या समस्येवर धनबादमधल्या अजित यादव, सिद्धार्थ सुमन आणि मनीष बलमुचू या तीन अभियंत्यांनी (Engineers) उपाय शोधून काढला आहे.

या तिघांनी यासाठी विशेष उपकरण विकसित केलं आहे. कोल इंडियाची (Coal India) उपकंपनी असलेल्या बीसीसीएल (BCCL) अर्थात भारत कुकिंग कोल लिमिटेडच्या वार्षिक सुरक्षा प्रदर्शनात या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हे तिघे `बीसीसीएल`मध्ये कार्यरत आहेत. कोळसा क्षेत्रात कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या काही दुर्घटना चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने होत असल्याचं या तिघांना आढळून आलं.

त्यामुळे असं काही तंत्र विकसित(Traffic rules) केलं पाहिजे, जेणेकरून ड्रायव्हरला दारू पिण्यापासून रोखता येईल, असं त्यांनी ठरवलं. हे ही WhatsApp च्या या फीचरचा हॅकर्सकडून होतोय गैरवापर, ही एक चूक पडेल महागात त्यानंतर अजित, सिद्धार्थ आणि मनीषनं यावर काम सुरू केलं. त्यांनी विकसित केलेल्या तंत्राला हायस्मार्ट सेफ्टी सिस्टिम अगेन्स्ट अल्कोहोल इन व्हेइकल हे नाव देण्यात आलं. त्यांनी असं उपकरण विकसित केलं आहे, की जे ड्रायव्हिंग सीटच्या समोर बसवलं जातं.

हे उपकरण सेन्सरद्वारे ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीचा श्वास कॅप्चर करतं. ती व्यक्ती दारू प्यायली असेल, तर हे उपकरण वाहन सुरू करण्यास परवानगी देत नाही. गाडीचं इंजिन आधीच सुरू असेल आणि त्यानंतर एखादी व्यक्ती दारू पिऊन ड्रायव्हिंग सीटवर बसली तर इंजिन आपोआप बंद(Traffic rules) होईल. या तिघांनी हे उपकरण वापरण्याची सूचनाही कंपनीला केली आहे.

याबाबत बीसीसीएलच्या पूर्व विभागाचे जीएम एस. एस. दास म्हणाले, ` हे उपकरण पुढील चाचणीसाठी डीजीएमएस (महासंचालक, माइन्स सेफ्टी) यांच्याकडे पाठवलं जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर, या उपकरणाच्या वापराच्या दृष्टीने पावलं उचलली जाऊ शकतात.`या उपकरणाला मंजुरी मिळाली, तर दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात आगामी काळात निश्चितच टाळता येऊ शकतील.

Smart News:-

लेफ्टनंट जनरल बीएस राजू नवे उप लष्करप्रमुख; काश्मीरात भरकटलेल्या दहशतवाद्यांना मोठी ‘संधी’ दिलेली


पंजाबविरुद्ध मॅचपूर्वी लखनऊला धक्का, टीमचे CEO कार अपघातात जखमी


युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी पुतीन इरेला पेटले; खास माणूस एसी ऑफिस सोडून थेट युद्धभूमीत


रुपाली ठोंबरे-पाटील यांची समाजमाध्यमांवर बदनामी; मनसेच्या 16 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *