सोने दर उतरला, चांदीचा भावही घसरला…

gold price today

भारतीय बाजारात आज सोने – चांदी दरात (Gold-Silver Price) घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने वायदे भाव 0.3 टक्क्यांनी घसरुन 52,712 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (gold price today) आला आहे. तर चांदीचा भाव 0.6 टक्क्यांनी घसरुन 69970 रुपये प्रति किलोग्रॅमवर (Silver Price Today) आहे.

मागील आठवड्यात सोने दर (gold price today) वाढून 55,558 रुपयांवर पोहोचला होता, जो ऑगस्ट 2020 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाच्च 56,200 रुपयांजवळ होता.युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी आज होणार आहे. हे संकट सोडवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना वेग आला आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार आणि कमॉडिटी मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. युद्धाचा जगभरात परिणाम होतो आहे. रशिया – युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणुकदार जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक टाळत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोठा कल आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात देशात सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत सोन्याची आयात 26.11 अब्ज डॉलर इतकी होती.


हेही वाचा :


शरद पवाराचे हात बळकट करा


आर्य चाणक्य पंत संस्थेच्या ठेवीदारांचा मेळावा उत्साहात


महाद्वार दर्शनासाठी खुले भाजपाच्यावतीने आनंदोत्सव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *