राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांसाठी खूशखबर..!

राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या वाहतूक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचारी, झेडपी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.(government employees)
वाहतूक भत्त्यात वाढ करण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार 1 एप्रिलपासून करणार आहे. किमान 675 ते 5400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. केंद्राने 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला.(government employees)
केंद्राने वाहतूक भत्त्यात केलेली वाढ राज्य कर्मचाऱ्यांना दिली नव्हती. सरकारच्या निर्णयानुसार मुंबई, एमएमआर, नागपूर, पुण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 1000 ते 5400 रूपये तर इतर ठिकाणी 676 ते 2700 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा :