आता तुमच्या क्रशची कोणतीही पोस्ट होणार नाही मिस; Instagram मध्ये आला शानदार फीचर

Instagram

इंस्टाग्रामनं (Instagram)  युजर्सना त्यांची फीड बघण्यासाठी दोन नवीन पर्याय दिले आहेत, अशी माहिती एका ब्लॉग पोस्टमधून इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri यांनी दिली आहे. आता युजर Favourites आणि Following या दोन पद्धतीनं आपली इंस्टा फीड सेट करू शकतील.

त्यामुळे युजर्सना त्यांच्या आवडीच्या पोस्ट दिसतील आणि त्यांना चांगला अनुभव मिळेल.

ब्लॉग पोस्टनुसार, युजरच्या इंस्टाग्राम फीडमध्ये फोटो आणि रिल्स व्हिडीओचं मिसरहून असतं. फक्त फॉलो करत असलेल्या लोकांच्या नव्हे तर सुचवलेल्या लोकांच्या पोस्ट देखील युजर्सना बघाव्या लागतात. परंतु आता Following या फिचरमुळे युजर ते फॉलो करत असलेल्या युजर्सच्या रिसेंट पोस्ट बघता येतील. तर Favourites मध्ये युजर्स स्वतः ठरवू शकतील की त्यांना कोणाच्या पोस्ट बघायच्या आहेत. यात ते मित्र-मैत्रिणी किंवा क्रियेटर्सचा समावेश करू शकतात.

Favourites आणि Following फिचर वापरण्यासाठी:

  • सर्वप्रथम Instagram अ‍ॅप होम पेजवर जा.
  • त्यांनतर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात Favourites आणि Following च्या दोन टॅब दिसतील.
  • यापैकी एकाची निवड करा आणि त्या फीडमधील पोस्ट बघा.
  • Favourites लिस्टमध्ये युजर 50 अकाऊंट जोडू शकतील. ही यादी बदलता येईल. नेहमीच्या फीडमध्ये देखील या युजर्सच्या पोस्ट वर असतील.

Smart News:-

MPSC: राज्य सरकारची तब्बल 6 हजार जागा भरण्याची मागणी


हा जाळणारा उन्हाळाही उर्फीच्या कपड्यांसमोर फिका…


“काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? Youtube वर टाका, फ्री होईल”-केजरीवाल


मराठमोळी अभिनेत्री लागली अध्यात्माच्या मार्गाला…; अ‍ॅक्टिंगला ठोकला कायमचा रामराम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *