कोल्हापूर उत्तर’चे भविष्य फक्त यांच्या हाती!

kolhapur news – कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. या पोटनिवडणुकीत 58 टक्के मतदार 18 ते 49 या वयोगटातील आहेत. वयाची 40 वर्षेही न ओलांडलेल्या मतदारांची संख्या 37 टक्क्यापर्यंत आहे. या निवडणुकीत 2 हजार 900 मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या यादीनुसार ‘उत्तर’साठी 2 लाख 91 हजार 583 मतदार आहेत. दि. 8 मार्चपर्यंत झालेल्या नोंदीनुसार यामध्ये आणखी 158 मतदारांची भर पडली आहे.
या मतदारसंघात 18 ते 39 या वयोगटातील 1 लाख 8 हजार 481 इतके मतदार आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 37 टक्के इतके आहे. 18 ते 49 या वयोगटात 1 लाख 70 हजार 158 मतदार असून हे प्रमाण एकूण मतदारांच्या तुलनेत 58 टक्के आहे. 40 ते 59 या वयोगटातील मतदारांचे प्रमाण 39 टक्के आहे.
ज्याला 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झाली तसेच अद्याप नोंदणी न केलेल्या मतदारांनाही मुदतीत मतदार नोंदणी करता येईल. दि.24 मार्च रोजी पुरवणी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्पूर्वी सात दिवस पूर्वीपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. ही पुरवणी यादीही मतदानांसाठी ग्राह्य धरली जाणार (kolhapur news) आहे.
या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपैकी अधिक आहे. 8 मार्च अखेरच्या नोंदीनुसार 1 लाख 45 हजार 718 पुरुष तर 1 लाख 46 हजार 11 महिला मतदार आहेत. 80 वर्षांवरील मतदारांची संख्या मात्र, दोन महिन्यांत दोनने कमी झाली. जानेवारीत या वयोगटातील 11 हजार 275 मतदार होते, मार्च महिन्यात ते 11 हजार 273 इतके झाले आहेत. 95 सर्व्हिस व्होटर (सैनिक मतदार) आहेत तर मतदार म्हणून 12 तृतीयपंथी व्यक्तींचीही मतदार यादीत नोंद आहे.
हेही वाचा :
शरद पवाराचे हात बळकट करा
आर्य चाणक्य पंत संस्थेच्या ठेवीदारांचा मेळावा उत्साहात
महाद्वार दर्शनासाठी खुले भाजपाच्यावतीने आनंदोत्सव…
आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र यावे