लाज गेली! महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने बोलून दाखवली. काल शनिवारी झालेल्या स्पर्धेत (competition) इतिहास घडला होता.
अवघ्या १९ वर्ष वयाच्या पृथ्वीराजने कोल्हापुरचं नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले. पण त्याला बक्षीसच न दिल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले. साता-यात झालेली उपेक्षा ही गंभीर असल्याचे सध्या बोलले जातय. या प्रकारावर जागतीक कुस्ती स्पर्धेत (competition) विजेतेपद मिळवलेल्या सोनबा गोंगाने याने सुद्धा आवाज उठवलाय. कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातुन येतात यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस देणे गरजेचे आहे, जर हे दिले गेले नसेल तर नक्कीच बक्षीस का दिले गेले नाही याची माहिती घेतली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
मल्ल प्रचंड मेहनतीने हा किताब मिळवतात बक्षीसच देण्याची जबाबदारी जर शासनाची असेल तर शासनाकडून हे बक्षीस दिलं जाईल आणि जर ही जबाबदारी आयोजकांची असेल तर आयोजकांना सुचना दिल्या जातील. मात्र बक्षीसच न देणे ही मोठी चुक असल्याचं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलय.
हेही वाचा :