ओमिक्रॉन आणि डेल्टा मिश्रित नव्या व्हेरियंटचा चीनला धसका

Variant

बीजिंग:चीनच्या वुहान शहरात २०१९ साली पहिल्यांदा कोरोना(1st Variant) आढळून आल्यानंतर या विषाणूने जगभर धुमाकूळ घातला. गेल्या दोन वर्षांच्या काळात जगभरात कोरोना संक्रमणाच्या तीन लाटा आदळून गेल्या. यामध्ये सुमारे ६० लाखांहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. याच दरम्यान, चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे जगाला कोरोना संक्रमणाच्या चौथ्या लाटेचा धोका सतावत आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ च्या तुलनेत यंदा आतापर्यंत सर्वाधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली. याचसोबत जागतिक आरोग्य संघटनेने जगाला तिसऱ्या कोरोना संक्रमणाच्या चौथ्या लाटेच्या धोक्याची पूर्वसूचना दिली आहे.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार: ओमिक्रॉन आणि डेल्टा या कोरोनाच्या दोन व्हेरियंटच्या(2 Variant) मिश्रणामुळे एक नवा व्हेरियंट जगात दाखल होऊ शकतो आणि या व्हेरियंटमुळे(Variant) जगाला कोरोना संक्रमणाच्या चौथ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. चीनमध्ये एका दिवसात  १३३७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. ‘रॉयटर्स’च्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये गेल्या वर्षी एकूण ८३७८ रुग्णांची नोंद करण्यात आली. २०२२ वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत आतापर्यंत ९ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंग, शांघाय, शेडोंगसह यांसहीत इतर काही राज्यांतून हे रुग्ण समोर आले आहेत.

चीनमध्ये सध्या ३० दशलक्षाहून अधिक लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. त्यामुळेच देशातील वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा चिनी अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शेनझेन शहरात हुवावे आणि टेनसेंट या चीनच्या दोन प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यालय आहे. याच शहराची सीमा हाँगकाँगला लागूनच आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे हाँगकाँगची परिस्थिती ढासळत असल्याचे समोर येत आहे. हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात २७ हजार ६४७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. शहरात आणखीन ८७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर एकूण मृतांच्या संख्येचा आकडा ३.७२९ वर पोहचला आहे.

याच दरम्यान, चीनमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरात लॉकडाऊन आणि इतर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शांघायमध्ये शाळा पार्क बंद घालण्यात आली आहे. बीजिंगमध्येही रहिवासी भागांत प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर आणि शहराबाहेर पडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

Smart News:-

दहावीच्या परीक्षेला सुरुवात


Redmi Note 11 Pro+ 5G आणि Redmi Watch 2 Lite चा पहिला सेल सुरू


द कश्मीर फाईल्स: काश्मिरी पंडितांच्या पलायनाला जबाबदार कोण?

Leave a Reply

Your email address will not be published.