‘या’ दोन शेअर्सने केले मालामाल, महिन्याभरात 832 कोटींची कमाई!

rakesh jhunjhunwala stocks

नवीन आर्थिक वर्षामध्ये शेअर बाजाराने चांगलीच उसळी घेतली आहे. सोमवारी बाजाराच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि बँक निफ्टी 1 हजारांहून अधिक पॉइंटने वाढला. यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली असून याचा फायदा दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (rakesh jhunjhunwala stocks) यांनाही झाली आहे.

राकेश झुनझुनवाला हे आघाडीचे गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या पोर्टफोलियोवर सर्वांचे लक्ष असते. ते कोणत्या शेअरवर पेसे लागतात आणि कोणत्या शेअरमधून पैसे वाढतात हे पाहून काही गुंतवणूकदार आपला पैसा लावत असतात. झुनझुनवाला देखील विचारपूर्वक शेअरमध्ये गुंतवणूक करतात. गेल्या काही दिवसात बाजारात सुगीचे दिवस आलेले असून याचा फायदा झुनझुनवाला यांनाही झाला आहे. त्यांना दोन शेअरने महिन्याभरात तब्बल 832 कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे.(rakesh jhunjhunwala stocks)

स्टार हेल्थने कमवून दिले 550 कोटी (Star Health Stock Price)

नुकताच लिस्ट झालेल्या स्टार हेल्थ इन्शूरन्स या शेअरची किंमती महिन्याभरात 686.60 रुपयांवरून 741.50 रुपयांवर पोहोचली आहे. महिन्याभरात या शेअरमध्ये 54.50 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी या कंपनीचे 10 कोटी 7 लाख 53 हजार 935 शेअर विकत घेतले होते. याच शेअरमध्ये महिन्याभरात आलेल्या तेजीमुळे झुनझुनवाला यांची संपत्ती 550 कोटींनी वाढली.

rakesh jhunjhunwala stocks

मेट्रो ब्रान्ड शेअरमध्ये तेजी (Metro Brand Stock Price)

झुनझुनवाला दाम्पत्याकॉडे मेट्रो ब्रान्ड या कंपनीचे 1 कोटी 30 लाख 51 हजार 188 शेअर आहेत. तसेच Aryavir Jhunjhunwala Discretionary Trust आणि Aryaman Jhunjhunwala Discretionary Trust च्या नावावर 3 कोटी 91 लाख 53 हजार 600 शेअर आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये महिन्याभरात 72.05 रुपयांची वाढ झाली आहे. अशा पद्धतीने झुनझुनवाला यांना 282 कोटींचा फायदा झाला आहे.

हेही वाचा :


BIG BREAKING: संजय राऊत यांची संपत्ती जप्त..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *