‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांना अटक

Smart News:- जम्मू काश्मीर पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यातून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांना अटक केली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना मदत करणे, जम्मू काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देऊन दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी तयार करणे हे उद्योग अटक केलेले सहाजण करत होते.
अटक केलेल्यांची ओळख पटविण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. रउफ अहमद लोन अमजिद, आकिब मकबूल भट, जावेद अहमद दार, अर्शीद अहमद मीर, रमीझ राजा, सजाद अहमद दार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. प्राथमिक तपासात अटक केलेले सहाजण दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर पैसे आणि इतर लहान-मोठी मदत करण्यासाठी सक्रीय होते असे उघड झाले आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केलेले सहाजण रेयाझ अहमद दार, खालिद आणि शीराज या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
वर्षभरात जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या १५० जणांना अटक केली आहे. अटक केलेले सर्वजण मोठ्या दहशतवादी कारवायांना छुप्या पद्धतीने मदत करत होते. पोलीस दहशतवाद्यांच्या स्थानिक सहकाऱ्यांना अटक करून दहशतवादी कारवाया कमी करण्यात यशस्वी झाले आहेत. यामुळे आजची पुलवामातील कारवाई दहशतवादी कारवायांची कोंडी करण्यात यशस्वी होईल, असे पोलिसांनी सांगितले.
याआधी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील शंकरपुरा नौगाम भागात सुरक्षा पथकांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. ही चकमक सुरू असताना अडवणूक करण्यासाठी सुरक्षा पथकांवर दगडफेक करणाऱ्या पंधरा जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षा पथकांवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पण जम्मू काश्मीरच्या निवडक भागांमध्ये अधूनमधून दगडफेकीच्या घटना घडत आहेत. या घटनांवर लवकरच नियंत्रण मिळवू असे पोलिसांनी सांगितले.
Smart News:-
युक्रेन युध्दाचा भारतीय सामरिक सज्जतेवर गंभीर परिणाम
कोल्हापुरात काँग्रेस-भाजप यांच्यात चुरशीची लढत, शिवसेनेचा अलिप्त राहण्याचा निर्णय
Apple Watch : ऍपल वॉचने वाचवला डेंटिस्टचा जीव, पत्नीकडून ऍपलचे आभार
Perfect learning : काळानुसार बदलणारे टप्पे