भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर उत्तरची संधी द्यायला हवी होती…

Smart News

Smart News:- भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर उत्तरची संधी द्यायला हवी होती. मुळात कोल्हापूर शहर हे भाजपधार्जिणे नाही. हे शहर वेगळे आहे. स्वाभिमान कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चोख उत्तर देण्याची ताकद कोल्हापुरकरांत आहे. आता निवडणुकीत काही मंडळी लोकांना डबे वाटत मते मागत आहेत, अशा लोकांना मतदार त्याच डब्यात घालून परत पाठवतील’ असा टोला .पालकमंत्री सतेज पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे रविवारी (ता.२० मार्च) मेळावा झाला.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. या मेळाव्यात सर्वच नेत्यांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी कोल्हापूरच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना निवडून आणू या अशा भावना व्यक्त केल्या.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले,‘ शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, ‘ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर संबंधी आदेश दिला आहे. जागा वाटपाच्या निर्णय झाला आहे.राजेश क्षीरसागर यांना दुःख होणे साहजिक आहे. राजेश क्षीरसागर हे शिवसैनिक आहेत. ते पक्षप्रमुख ठाकरे यांचा आदेश मानतील.शिवसेना कधी दगाफटका करत नाही.या निवडणुकीत भाजपचे बारा वाजतील.’ शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भाषणात कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्ण शिवसेना जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहिल.

कोल्हापूर हे स्वाभिमानी शहर आहे. येथील राजकारण वेगळे आहे.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची नाराजी येत्या काही दिवसांत दूर होईल. त ही प्रचारात सहभागी होतील. ‌” शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला जागा सोडली आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे तो आदेश शिवसेनेचे कार्यकर्ते पाळतील. “राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आर.के.पोवार म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे.

यामध्ये दगाफटका झाला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील ‌‌” यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी नगरसेविका भारती पोवार, आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष डी.जी.भास्कर यांची भाषणे झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. (Smart News)

मेळाव्यास माजी आमदार सुरेश साळोखे, कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या सरला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे,माजी महापौर सई खराडे, वंदना बुचडे, स्वाती यवलुजे, निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, संजय मोहिते, परिक्षीत पन्हाळकर, स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, आदिल फरास, संदीप कवाळे, सचिन पाटील, माजी नगरसेवक संभाजी जाधव, शिवसेनेचे विनायक साळोखे, रवी चौगुले, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, दत्ता टिपुगडे, स्मिता मांडरे, मंजित माने, संध्या घोटणे,जहिदा मुजावर आदी उपस्थित होते.

 

Smart News:-

हसता हसता डोळ्यातून अश्रू येण्यामागे ‘हे’ आहे कारण


रशियन सैनिकांविषयी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर


weight loss: ‘या’ भाजीचा रस तुमचे वजन करेल झटपट कमी, आजपासूनच प्यायला सुरुवात करा


‘…तेव्हा नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हतं’ the kashmir files सिनेमावरून शरद पवारांनी भाजपला दाखवला आरसा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *