अभिनेत्रीला टॅक्सी ड्रायव्हरने लुटले

social media images of swara bhaskar

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्वरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो (social media images) आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्याच्या संपर्कात राहते. सध्या स्वरा ही लॉस एंजेलिसमध्ये आहे. तिला तिथे एक वाईट अनूभव आला आहे. याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने सांगितले आहे.

स्वरानं तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग ट्वीट करत सांगितला आहे. स्वराने ट्वीट करत Uber Cab कंपनीला तक्रार दाखल केली आहे. स्वरा म्हणाली, “उबर कंपनीनं कृपया माझी ही तक्रार नोंदवून घ्या. तुमचा एक ड्रायव्हर माझा सगळा सामान घेऊन फरार झाला आहे. तुमच्या अॅपवर तक्रार करण्यासाठी कुठलीच सोय नाही आहे. हे काही मी चुकून विसरले वगैरे नाही. तर तो चक्क माझा सामान घेऊन पळाला आहे.”

स्वराच्या या ट्वीटवर  (social media images) उबर कंपनीने उत्तर दिले आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “तुमच्यासोबत जे घडलं यासाठी आम्ही दिलगीर व्यक्त करतो. पण निश्चितच आमच्या कंपनीच्या इतिहासात असं घडलेलं नाही. आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेत आहोत,आणि लवकरच आमच्याकडून ह्या तक्रारीची चौकशी होईल आणि तुम्हाला संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

कुटुंबासोबत होळी साजरी केल्यानंतर स्वरा अमेरिकेला गेली आहे. तिनं आपल्या ट्रॅव्हल एक्सपीरियन्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत. स्वराची ‘शीर कूर्मा’ शॉर्ट फिल्म लवकरच रीलीज होणार आहे. यात शबाना आझमी आणि दिव्या दत्ता आहेत. फराझ अरिफ अन्सारी यांनी या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे.


हेही वाचा :


याचा फायदा होणार नाही, रोहित शर्माचा दावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *