Flipkart ची कृपा! 266 रुपयांमध्ये 6000mAh ची बॅटरी असलेला Realme फोन; स्टॉक संपण्याच्या मार्गावर

Realme

खूप कमी स्मार्टफोन्समध्ये 6000mAh ची बॅटरी मिळते. असाच एक Realme Narzo 50A नावाचा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी बाजारात आला होता.

जो सध्या Flipkart वरील सेलमध्ये फक्त 266 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. त्यामुळे जर तुम्ही जास्त बॅटरी बॅकअप असलेला हँडसेट शोधत असाल तर तुम्ही या जबरदस्त ऑफरचा फायदा सहज घेऊ शकता.

Realme Narzo 50A वरील ऑफर्स

Realme Narzo 50A स्मार्टफोनचा 64GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. फ्लिपकार्ट या डिवाइसवर 1350 रुपयांचा थेट डिस्काउंट देत आहे. त्यामुळे हा मॉडेल 11,649 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतला तर 583 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच 10,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील या डिवाइसवर देण्यात आली आहे. या तिन्ही ऑफर्स एकत्र केल्यास नवाकोरा Realme Narzo 50A स्मटफोन फक्त 266 रुपयांमध्ये घरी आणता येईल.

Realme Narzo 50A चे स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 50A मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 x 1600 पिक्सल रेजोल्यूशन आणि 570nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 SoC सोबत माली-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील फोनमध्ये देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 कस्टम स्किनवर चालेल.

Realme Narzo 50A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पीडीएएफ आणि 10X डिजिटल झूमसह 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP ची B&W पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे. या रियलमी फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात या फोनमध्ये 18W फास्ट-चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Smart News:-


राज यांच्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे घेणार औरंगाबादेत सभा,टीकेला देणार प्रत्युत्तर


शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन


कोल्‍हापूर : अंबाबाई मंदिरात भाविकांच्या पाकिटावर डल्ला,


बायकोच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘मला माफ कर’; अन्…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *