सुताच्या दरात दिवसेंदिवस वाढच

दीड महिन्यात किलो मागे ५० रूपयांची वाढ : कापडाला दर नाही
इचलकरंजी: गेल्या दीड महिन्यापासून सूतदरात होत असलेली भरमसाठ वाढीमुळे साध्या यंत्रमागधारकांना(Powerloom) अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या दीड महिन्यात प्रति किलो सुतामध्ये सुमारे ५० रूपयांची वाढ झाली आहे. सुताप्रमाणे कापडाच्या दरात म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्याचबरोबर म्हणावी तशी मागणी नाही. त्यामुळे सध्या यंत्रमाग व्यवसाय आर्थिक नुकसानीत करावे लागत आहे.
यंत्रमागधारकांपुढील(Powerloom) विविध समस्यांचा अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी राज्यशासनाने समिती गठीत केली आहे. सदरची समिती राज्यातील यंत्रमाग सेक्टरांना भेटीदेवून यंत्रमाग धारकांच्या समस्या जाणून घेत आहेत. इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांपुढे ज्या समस्या आव आणून पुढे आहेत त्या समस्या भिवंडी, मालेगांव आदी ठिकाणी ल्या असलेल्या यंत्रमाग सेक्टरीमधील उद्योजकांपुढे आहेत. मालेगांव, भिवंडीमधील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांपुढे विविध समस्यांचा डोंगर उभा आहे.
त्यामुळे संपूर्ण राज्यातील यंत्रमागधारकांपुढे(Powerloom) एक सारखीच समस्या निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याची गरज असल्याचे जाणकारातून बोलले जात आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुताच्या प्रत्येक काऊंटमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या दीड महिन्यात किलोमागे ५० रूपयांने वाढले आहे. ज्याप्रमाणे सुताचे दर गगणाला भिडत आहे. त्याप्रमाणात कापडाला दर मिळत नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. तसेच कापडाला म्हणावी तशी मागणी नसल्याचे दिसून येत आहे.
प्रती पीक, प्रती मिटर ६ पैसे उत्पादन खर्च होत असताना मजूरी मात्र ३ ते चार पैसे मिळत आहे. त्यामुळे यंत्रमागधारक आपला व्यवसाय नुकसानीत करत असल्याचे दिसून येत आहे. साध्या यंत्रमाग धारकाप्रमाणे अॅटोलूम धारकांची परिस्थिती त्याचप्रमाणे दिसून येत आहे. मजूरीवर घेणाऱ्या अॅटोलूम धारकांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. अॅटोलूमवर वेगवेगळ्या व्हरायटीचे कापड उत्पादन होत असल्याने त्यांना बऱ्यापैकी मजूरी मिळत असल्याचे बाजारपेठेत बोलले जात आहे.
Smart News:-
दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास पालिका प्रशासनापुढे सतरा विघ्ने
एकीकडे उन्हाचा, दुसरीकडे अवकाळीचा तडाखा
भारतीयांचं सरासरी वय वाढलं, 1970 मध्ये 47 वर्षांपर्यंत जगायचे लोक, आता झालं एढं!