‘हा’ आहे अस्सल Multibagger Stock

multibagger stock

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या नजरा कायम तिथल्या चढ-उतारावर लागून असतात. काही शेअर्सच्या किमती कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान होतं, तर काही शेअर्स गुंतवणूकदारांना अकल्पित नफा देऊन जातात. अशाच प्रकारे गेल्या एका वर्षात भारतीय शेअर बाजारात (Stock Market) शेकडो शेअर्स मल्टिबॅगर बनले आहेत. या स्‍टॉक्‍सनी गुंतवणूकदारांना अक्षरशः वेड लावलं आहे. काही स्टॉक्स तर असे आहेत, की जे गुंतवणूकदारांना कायमस्वरूपी मल्टिबॅगर परतावा (multibagger stock) देत आहेत. या शेअर्सचं वैशिष्ट्य म्हणजे, शेअर बाजाराच्या चढ-उताराचा या स्टॉक्सवर काहीही परिणाम होत नाही आणि त्यांचं मूल्य केवळ वाढतच आहे.

या मल्टिबॅगर स्टॉकच्या (multibagger stock) यादीत राधिका ज्वेलटेक या दागिने बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकचाही समावेश आहे. हा शेअर गेल्या एका वर्षापासून सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत आहे. बुधवारीदेखील (27 एप्रिल 2022) राधिका ज्वेलटेकचा शेअर बीएसईवर (Bombay Stock Exchange) 4.47 टक्क्यांच्या वाढीसह इंट्रा-डेमध्ये 194 रुपयांवर ट्रेंड करत होता.

एका वर्षात झाला भरघोस नफा

राधिका ज्वेलटेकचा शेअर गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देत आहे. एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1111 टक्के नफा दिला आहे. 28 एप्रिल 2021 रोजी राधिका ज्वेलटेकच्या शेअरचा दर 16 रुपये होता. तो आता तब्बल 193.30 रुपये एवढा झाला आहे. त्याचप्रमाणे या शेअरने गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरच्या दरात 32 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे 2022 मध्ये या शेअरने आतापर्यंत 46.71 टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये या शेअरने 9.40 टक्क्यांनी उसळी घेतली आहे.

टायटन (Titan), राजेश एक्सपोर्ट्स (Rajesh Exports) आणि कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewelers) यांसारख्या इतर दागिने निर्मात्यांच्या तुलनेत राधिका ज्वेलटेकच्या शेअर्सनी एका वर्षात जास्त परतावा दिला आहे. टायटन कंपनीच्या शेअर्सनी (Titan Share) बीएसईवर एका वर्षात 66.56 टक्के परतावा दिला आहे. राजेश एक्स्पोर्ट्सच्या शेअर्सचं मूल्य एका वर्षात 19.67 टक्क्यांनी वाढलं आहे.

1 लाखाचे झाले 12 लाख

एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी राधिका ज्वेलटेकच्या या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आता त्यांच्या एक लाख रुपयांचे आता 12 लाख 12 हजार 500 रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आज त्या गुंतवणुकीचं मूल्य 2 लाख 25 हजार 428 रुपये एवढं झालं आहे.

Smart News:-

टीम इंडियाला मिळाले जगातील 2 बेस्ट घातक बॉलर्स


वैवाहिक जीवनात सुखी राहायचंय, ‘या’ 4 चुका प्रकर्षानं टाळा!


येत्या 4 ते 5 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *