राज्‍यसभेत गदारोळ, १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित

राज्‍यसभेत महागाईच्‍या मुद्‍यावर गदारोळ घालणार्‍या १९ खासदारांना आजआठवडाभरासाठी निलंबित (suspended) करण्‍यात आले. निलंबित खासदारांमध्‍ये तृणतूल काँग्रेसचे ७, द्रमुकचे ६, टीआरएसचे ३ सीपीआयएमचे २ आणि सीपीआयच्‍या एका सदस्‍याचा समावेश आहे.

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्‍यावर महागाई आणि अत्‍यावश्‍यक वस्‍तुंवर जीएसटी लागू करण्‍यात आल्‍याचे निषेधार्थ विरोधी पक्षाच्‍या सद्‍यांनी नियम २६७ नुसार चर्चा करण्‍याची मागणी केली. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे खासदार आक्रमक झाले. त्‍यांनी उपसभापतींच्‍या आसना समोरील मोकळ्या जागेत येवून जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी उपसभापती हरिवंश यांनी खासदारांना वारंवार सूचना दिल्‍या. त्‍या धुडकावत खासदारांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली. यानंतर उपसभापती हरिवंश यांनी नियम २५६ नुसार तृणतूल काँग्रेसचे ७, द्रमुकचे ६, टीआरएसचे ३ सीपीआयएमचे २ आणि सीपीआयच्‍या एका सदस्‍याला (suspended) निलंबित केले.

निलंबित केलेल्‍या खासदारांमध्‍ये तृणमूल काँग्रेसच्‍या खासदार मौसम नूर, सुष्‍मिता देव, शांता छेत्री, डोला सेन, शांतनु सेन, अभि रंजन बिस्‍वास आणि मोमम्‍द नदीमूल, द्रमुकचे खासदार हामिद अब्‍दुल्‍ला, एस. कल्‍याणसुंदरम, आर गिररंजन, एन.आर. एलेंगो, एम. शनमुगम, एनव्‍हीएम सोमु कनीमोझी, माकपचे ए. ए. रहीम, व्‍ही. शिवदासन, भाकपचे संदोष पी. कुमार, तेलगु देसम पार्टीचे से बी लिंगैया यादव, रविहंद्र वड्‍डीराजू आणि दामोदर राव देवकोंडा यांचा समावेश आहे.

हेही वाचा :


उद्धव ठाकरेंना अडकवण्याच्या नादात स्वतःच अडकले एकनाथ शिंदे?

Leave a Reply

Your email address will not be published.