श्रीलंकेत पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठी हिंसा,

Prime Minister

आर्थिक दिवाळखोरीच्या कारणाने आणि विरोधकांनी टाकलेल्या दबावामुळे श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे(Prime Minister) यांनी राजीनामा दिला.

त्यानंतर राजधानी कोलंबोसह देशातील इतर भागांत सरकार समर्थक आणि विरोधक यांच्या जबरदस्त हिंसाचाराच्या घटना घडण्यास सुरुवात झाली आहे. या हिंसाचारात सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ती अथुकोरला यांचा मृत्यू झाला आहे. गर्दीने माजी मंत्री जॉन्सटन फर्नांडो यांच्या अलिशान घराला देखिल आग लावली. त्यांच्या परिवाराची मोठ्या अवघड परिस्थितीत या सगळयातून सुटका झाली आहे. तर आणखी एक खासदार सनथ निशांथा यांच्या घरालाही आग लावण्याचा प्रयत्न झाला आहे. देशात अशा प्रकराच्या घटनांत मोठी वाढ होत असतानाचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे देशातील प्रमुख शहरांत सैन्य तैनात करण्याची शक्यता आहे.

आता पुढे काय होणार?

गेल्या आठवड्यात विरोधकांचे नेते सिरिसेना यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्या बैठकीत पंतप्रधान महिंदा दे राजीनामा(Prime Minister) देतील, हे ठरले होते. यानंतर देशात हंगामी सरकार स्थापन होईल. मात्र हंगामी सरकारची स्थापना करण्यापूर्वी देशात शांतता असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारमध्ये आत्ताही राजपक्षे परिवाराचा दबदबा आहे. मात्र देशाच्या सद्यस्थितीत विरोधकांना बरोबर घेऊन तेही या परिस्थितीला तेवढेच जबाबदार आहेत, हे दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे हंगामी सरकारची स्थापना लवकर होऊ शकते. देशाला जर सद्यस्थितीत वाचवायचे असेल तर सरकार आणि राष्ट्रपतींना सध्या साथ देणे गरजेचे आहे, हे विरोधकांनाही कळून चुकले आहे.

हिंसा कुणाच्या इशाऱ्याने

श्रीलंकेच्या अनेक भागांत पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात हिंसक चकमकी होत असल्याचे वृत्त आहे. महिंदा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मोठी धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महिंदा यांचे मोठे भाऊ राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे पंतप्रधानांनी(Prime Minister) राजीनामा देऊ नये, या मताचे होते. मात्र विरोधकांच्या दबावापुढे त्यांना झुकावे लागले. दुसरीकडे त्यांनी त्यांच्या समर्थकांना रस्त्यावर उतरवले आहे. आता राजपक्षे बंधुंचे समर्थक आणि विरोधक यांच्यात देशातील अनेक भागांत हिंसक चकमकी सुरु झाल्या आहेत.

खासदाराचा मृत्यू कसा झाला

खासदार अमरकिर्ती हे आपल्या कारमधून सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हरसह निटामबुवात एका रस्त्यातून जात होते. त्यांच्या गाडीवर लाल दिवा होता. त्याच रस्त्यावर शेकडो सरकार विरोधी आंदोलक उपस्थित होते. या आंदोलकांनी गाडीला घेरले आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर खासदार रागात खाली उतरले आणि तयांनी गर्दीवर स्वताच्या पिस्तुलाने गोळीबार केला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर खासदार एका जवळच्या बिल्डिंगमध्ये लपून बसले होते. त्यानंतर काही वेळात त्यांचा मृतदेहच त्या ठिकाणी सापडला. त्यांचा मृत्यू जमावाच्या हल्ल्यात झाला की इतर काही कारण त्यामागे होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरकार विरोधक आणि समर्थकांत चकमकी

विरोधी आंदोलन करणारे सरकारचे विरोधक आणि राजपक्षेंचे समर्थक यांच्यात सोमवारी सकाळीही हिंसक चकमक झाली. यात 78 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिकेचे राजदूत जूली चुंग यांनी या हिंसाचराचा निषेध नोंदवला आहे.

Smart News:-

मुंबईला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर


नवनीत राणांच्या फोटोसेशनमुळे लिलावती रुग्णालय अडचणीत; शिवसेना आक्रमक


राज्यात कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ, आज शुन्य मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत


इलेक्ट्रिक वाहने खरच पर्यावरणपूरक आहेत का? वाचा Electric Vehicle मागचं धक्कादायक सत्य


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *