कोल्हापूर : शिरोळमध्ये तरुणावर ॲसिड टाकून निर्घुण खून..!

तमदलगे ता. शिरोळ येथे तरुणाचा सडलेला मृतदेह आज आढळून आला. तोंडावर (acid) ॲसिड टाकून आणि दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष जयसिंगपूर पोलिसांनी काढला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत तरुणाचे वय अंदाजे ३५ आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. २९) रात्री उघडकीस आला. या घटनेमुळे तमदलगे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तमदलगे येथील डोंगरावर काही मुले फिरण्यासाठी आली होती.

सायंकाळी ही मुले परत जाताना पाझर तलावाजवळ मृतदेह आढळून आला. त्या मुलांनी हातकणंगले पोलिसांना कळविले. त्यानंतर हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. त्यावेळी हा प्रकार जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांना कळविण्यात आले. त्या पोलिसांनी घटनेची माहिती घेतली व त्यानंतर रात्री अकराच्या दरम्यान पंचनामा झाला. मृत तरुणाची ओळख पटली नाही. चार दिवसांपूर्वी या युवकांच्या तोंडावर (acid) ॲसिड टाकून दगड्याने ठेचून खून केल्याचे दिसून आले आहे.

मृतदेह काही प्रमाणात सडलेल्या अवस्थेत होता. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत या मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू होता. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ, अजित पाटील यांच्यासह पथक होते. या प्रकाराची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

हेही वाचा :


कोल्हापूर – जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *