इचलकरंजीत आत्ता फक्त कमळच! महायुतीच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विश्वास

इचलकरंजी, 14 नोव्हेंबर 2024 : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे(political news) अधिकृत उमेदवार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ एक ऐतिहासिक व भव्य निर्धार सभा आज शहापूर, इचलकरंजी येथील गावचावडी समोरील चौकात संपन्न झाली. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी उपस्थित राहून इचलकरंजीच्या विकासाबद्दल आश्वासन दिले.

सभेत उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजपा विधानसभेच्या निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले, भाजपा(political news) प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, भाजपा पक्ष प्रतोद तानाजी पोवार, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेवक दिलीप मुथा, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड आणि क. आ. जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी मा. नितीन गडकरी होते.

नितीन गडकरी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून इचलकरंजीच्या विकासाच्या दिशेने एक सकारात्मक दिशा दिली. त्यांनी इचलकरंजीसाठी महत्त्वपूर्ण योजना जाहीर करत, शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले. “इचलकरंजीचा विकास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि मी तुम्हाला विश्वास देतो की येत्या काळात इचलकरंजी हे देशातील प्रगत शहरांपैकी एक असेल,” असे ते म्हणाले. त्यांच्या या शब्दांनी इचलकरंजीच्या नागरिकांच्या आशा अधिकच बळकट झाल्या.

सभेला उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, भाजपा शहर अध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, अनिल डाळ्या, शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसाहेब आवळे, चंद्रशेखर शहा, रणजित अनुसे, राजेश रजपूत, सतीश डाळ्या, सुभास मालपाणी आणि दीपक राशिनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला नागरिक, युवक आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

या ठिकाणी झालेल्या सभेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विजयाचा निर्धार केला.

हेही वाचा :

शरद पवारांच्या पत्रामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

“मुंबई सोडून सेल्समनची नोकरी; दोन वेळच्या जेवणाची भ्रांत ते यशस्वीचा संघर्ष – भावाच्या हालअपेष्टांची कहाणी”

पाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा

सावधान! Whatsapp वर आलेलं ‘ते’ लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं