“धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्यामुळे गदारोळ, मुंडे समर्थक आक्रमक”

बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण तापलेले आहे. या सगळ्या प्रकरणात हत्याकारांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत झालेल्या मोर्चात(Manoj Jarange) मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केल्यानंतर परळीनंतर बीडमध्येही मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात मराठवाड्यासह राज्यभर ठिकठिकाणी मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडेंवर खालच्या भाषेत वक्तव्य करत कोणतही कारण नसताना वंजारी समाजाला धमकी देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange)आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आक्रमकपणे केली जाऊ लागली आहे.

मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला टारगेट करणाऱ्या जरांगे आणि दमानिया यांच्या विरोधात कारवाईसाठी राज्यात परभणी, ठाणे, बुलढाणा, बीड, परळीसह अनेक भागात मुंडे समर्थकांसह वंजारी समाज आक्रमक झाला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज केज पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं. प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे आणि विष्णू चाटे यांना अटक केल्यानंतर 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. यारोपिंना आणखी कोठडी वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनोज जरांगेंसह अंजली दमानियांविरोधात कारवाईसाठी मुंडे समर्थकांनी दबाव वाढवलाय. पोलीस ठाण्याबाहेर समर्थक आक्रमकपणे गुन्हा नोंदवण्याची मागणी करतायत.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी परभणी शहरांमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत या वक्तव्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असून जातीजातीत भांडण लागणार असल्याने जरांगेंवर गुन्हा दाखल करावा ही मागणी होत आहे.

या मागणीसाठी ओबीसी समाजाकडून परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या करण्यात आला असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय.

मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात कारवाईसाठी मुंडे समर्थक आणि वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कारवाईसाठी ठाण्यासह बुलढाण्यातही पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने करण्यात येत आहेत. बुलढाण्यातही मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर ओबीसी बांधवांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. प्रचंड घोषणाबाजी करत त्यांनी पोलीस स्थानक परिसर दणाणून दिला आहे.

हेही वाचा :

“चीनमधील HMPV विषाणूचा संकट, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान”

“दररोज २०० रूपयांची बचत, तुमच्या मुलांना बनवू शकते करोडपती”

‘अजितदादांनी असं बोलू नये’; छगन भुजबळ यांनी ‘त्या’ विधानावर दिला सल्ला