आपल्यापैकी अनेकजण गुगल(Map) मॅप्सचा वापर करतात, मात्र गुगल मॅप वापरायचे असेल तर त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते असे आपल्याला वाटते. मात्र असे एक फिचर आहे, ज्याच्या सहाय्याने आपण इंटरनेट नसलेल्या ठिकाणीही गुगल मॅपचा वापर दिशानिर्देशांसाठी करू शकतो.
या ऑफलाइन फिचरविषयी जाणून घेऊया. (Map)गुगल मॅप्सच्या वापरासाठी नेहमीच स्थिर इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते. दुर्गम भागात जिथे स्थिर इंटरनेट कनेक्शन नाही, तिथे खूप समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी ऑफलाइन मॅप्सचे फिचर उपयोगी पडते.
आधी गुगल मॅप ओपन करा.
प्रोफाइल आयकॉन
ऑफलाइन मॅप्स टॅप करा
आपला स्वतःचा मॅप्स निवडा.
ऑफलाइन असताना त्या ठिकाणी जाऊन हा डाऊनलोड केलेला मॅप्स वापरता येतो.
ऑफलाइन मॅप्स दिशादर्शक म्हणून उपयोगी आहे, परंतु रिअल टाइम ट्रफिक, पर्यायी मार्ग, सार्वजनिक वाहतूक आणि दुचाकी/वॉक दिशा अशा काही सेवा उपलब्ध नाहीत. एकूणच गुगल मॅप्सच्या ऑफलाइन फिचरमुळे इंटरनेटशिवाय प्रवास करणे सोपे झाले आहे.
मॅप्स डाऊनलोड करून, युजर्स आवश्यक नेव्हिगेशन टूल्समध्ये प्रवेश करू शकतात, अपडेट मिळवू शकतात आणि मर्यादा समजून घेऊ शकतात. दुर्गम ग्रामीण भागात, जिथे नेटवर्क नसते तिथे हा पर्याय उपयुक्त आहे.
हेही वाचा :
टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह Champions Trophy ला मुकणार?
शाहीदच्या फिल्ममध्ये 1 सेकंदाचाही रोल नाही, पण पोस्टरवर झळकले अमिताभ बच्चन
मविआच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव;थेट निवडणूक रद्द करण्याची मागणी