व्हिडिओ (social media)सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण, माणुसकीवर आणि मानवतेवर विश्वासाची प्रेरणा देणारे फार कमी व्हिडिओज इथे शेअर केले जातात.
नुकताच असाच एक व्हिडीओ (social media)सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आपोपाप स्मितहास्य येईल. हा व्हिडीओ एका आईचा आहे जी आपल्या मुलासाठी दूध आणण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली आणि तितक्यात ट्रेन सुरु झाली. आता आपल्या बाळ ट्रेनमध्ये सुटल्यानंतर पुढे काय झाले ते आपण आज या व्हायरल व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पहिले तर, यात एक महिला रेल्वे रुळावर उभी असल्याचे दिसत आहे. महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. ही महिला आपल्या मुलासाठी दूध किंवा काही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली होती, पण त्याच दरम्यान ट्रेन अचानक सुरु झाली. ट्रेन सुरु होताच महिला घाबरली आणि तिचे डोळे आपोआप पाणावले, आपल्या बाळाच्या विचाराने ती घाबरली.
ट्रेन सुरु झाल्यानंतर ती महिला खाली रुळावर हैराण आणि व्यथित दिसत होती. महिलेच्याही डोळ्यात पाणी आले. आता आपली गाडी चुकली, आपल्या बाळाचे आता काय होणार या विचाराने ती त्रस्त होऊ लागली. पण तितक्यात एक चमत्कार घडतो आणि अचानक ट्रेन थांबते. ट्रेन थांबताच महिला वेगाने ट्रेनच्या दिशेने धाव घेते आणि तिला चढण्याची संधी मिळते.
खरंतर, ट्रेन नुकतीच सुरु झाली होती, ती पूर्ण वेगात आली नसल्यामुळे महिलेची असहायता पाहून ट्रेन गार्डने ट्रेन थांबवली असा दावा केला जात आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक ट्रेन गार्डचे भरभरून कौतुक करत आहेत.
A mother went to buy milk, and the train started. The guard saw and stopped the train. pic.twitter.com/If8PRMxG5T
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) January 7, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Gulzar_sahab नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘एक आई दूध घ्यायला गेली आणि ट्रेन सुरू झाली, गार्डने ट्रेन पाहिली आणि थांबवली’ असे लिहिण्यात आले आहे.
व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “माणुसकी अजून जिवंत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई ही सर्वात मोठी योद्धा आहे. तिच्या चिकाटी, संयम आणि प्रेमाच्या पातळीशी कोणीही जुळू शकत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
पक्षाला सोडून जाणारे कंस आणि रावणाचे वंशज…”; खासदार संजय राऊतांची गंभीर टीका
हो आपण गाफिल राहिलो म्हणूनच…; पवारांकडून जाहीर कबुली अन् …
फणा काढत मुंगुसासमोर डिंग्या मारत होता नाग, तितक्यात बदलला खेळ; जीवघेण्या लढतीचा Video Viral