गटारात मेथी भाजी धुणाऱ्या भाजीवाल्याचा Video समोर

धावपळीच्या जगात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आपला आहार (fenugreek)महत्त्वाचा ठरतो. आपण जे अन्न ग्रहण करतो ते स्वच्छ आणि साफ असणं गरजेचं आहे. आता व्हिडीओ जो समोर आला आहे. त्यावरुन आपण जो आहार खातो तो किती अस्वच्छ आणि खराब आहे हे अधोरेखित होते. उल्हासनगरमध्ये चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांकडून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भाजीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प2मधील खेमाणी परिसरात हे भाजी मार्केट आहे. या मार्केटमधल्या पोस्ट ऑफिससमोरच्या उघड्या असलेल्या गटाराच्या पाण्यात ही भाजी बुडवूत धुत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एवढंच नव्हे तर भाजी विक्रेते देखील गटाराचे पाणी बादलीत घेतात आणि तेच पाणी भाज्यावर मारताना दिसतात. या भाज्यांची विक्री देखील करत असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शरीर सुदृढ राहण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात (fenugreek) हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करतात. पण जर अशा पद्धतीने गटाराच्या पाण्यात धुतलेली भाजी आपण खाल्ली तर त्याचा शरीरावर नक्कीच दुष्परिणाम होईल यात शंका नाही. याचा शरीराला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होईल यात शंका नाही. या प्रकरणात तेथीस भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अशा भाज्या खाऊन शरीरावर होणारा परिणाम?
गटारातील पाण्याने धुतलेल्या भाज्या (fenugreek)आहारात आल्यावर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो? पोटदुखी, जुलाब, अपचनासारख्या समस्या जाणवतात.
तसेच ज्या उद्देशाने आपण पालेभाज्या खातो तो उद्देश साध्यच होत नाही
मळमळ, उलट्या यासारख्या समस्या देखील तुम्हाला जाणवू शकतात?

हेही वाचा :

घटस्फोटापूर्वी चहलला धनश्रीबद्दल कळले होते सत्य जगासमोर व्यक्त केले आपले दुःख

स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्… महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे

रेझर वापरल्याने होतील त्वचेच्या समस्या, तुमच्या त्वचेसाठी काय आहे धोका?