‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले

बीडमधील गुन्हेगारीचं सत्र संपायचं नाव घेत नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजंच असताना बीडमधील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आलीय. या घटनेचा व्हिडिओ(Video) सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. कालपासून सर्व माध्यमांत हा व्हिडिओ फिरतोय. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, भाजप आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.

मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव सतीश भोसले असून तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यामुळे मोठं वादळ उठलं होतं. या व्हिडिओमुळे(Video) सुरेश धस यांच्यावर मोठी टीका होतेय. दरम्यान सतीश भोसले याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये भोसले नोटांचे बंडल कारमध्ये फेकताना दिसत आहे. या दोन्ही व्हिडिओमुळे मोठं वादळ उठलेलं आहे. यावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

सुरेश धस यांनी म्हटलंय की, मी सतीश भोसले याला ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. परंतु तो पाठीमागे काय उद्योग करतो, हे थोडीच मला माहिती आहे. शंभर टक्के सतीश भोसले याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा आताचा नसून दीड वर्ष जुना आहे. तो स्वत:ला बॉस समजतो म्हणून काय झालं? मीच बॉस म्हणून सांगत आहे की, भोसलेविरोधात कारवाई झाली पाहिजे. ही घटना महिलेच्या छेडीवरून घडली होती, अशी माहिती मिळत असल्याचं देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.

तर सतीश भोसलेविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. तर व्हिडीओमध्ये मारहाण करणारा व्यक्ती सतीश भोसले हा सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जातंय. यावरून विरोधकांनी टीका देखील केलीय. तर सुरेश धस यांनी यांसदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसले याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. व्हिडीओ शेअर करत त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले होते.

हेही वाचा :

राम गोपाल वर्मा यांना अटक होण्याची शक्यता! 

IPL सुरु होण्यापूर्वी मुकेश अंबानी घेणार मोठा निर्णय

राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडेंच्या अडचणीेंमध्ये वाढ! महायुतीच्या नेत्यांच्या सूचक विधानाने चर्चा