Viral Video: मोबाईलमध्ये गुंग तरुणाचा रस्ता ओलांडताना थरारक अपघात!

सोशल मीडियावर (social media)रोज काही ना काही व्हायरल होत असते. आजकालची पिढी मोबाईच्या आहारी गेली असून त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भान नसेत.

जेवताना, झोपताना उठताना कुठेही बाहेर जाताना सतत तरुण मुला-मुलींच्या हातात मोबाईल हा असतो. अनेकदा रस्त्या ओलंडताना देखील मोबाईलमुळे दुर्लक्ष करतात. यामुळे आत्तापर्यंत अनेकांचे अपघात झाले आहे. सध्या असाच एक व्हिडिओ(social media) व्हायरल आहे.

यामध्ये एक तरुण रस्त्या ओलांडताना मोबाईलमध्ये डोके खूपसून चालला होता. मात्र, त्याच्यासोबत असे काही घडले की, तो पुन्हा असे करण्याची हिम्मत देखील करणार नाही. मोबाईल पाहत निष्काळजापणाने रस्ता ओलांडणे या तरुणाला चांगलेच मबहागात पडले आहे.

याचा व्हिडिओ रस्त्यावरील एका कॅमेरात कैद झाला असून प्रचेड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, मात्र या व्हिडिओतून लक्षात घेण्यासारखे आहे की, आपला निष्काळजीपणामुळए आपला अपघात देखील होऊ शकतो.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मोबाईमध्ये बघत रस्त्या ओलांडताना दिसत आहे. तसेच रस्त्यावरुन गाड्यांची आणि इतर लोकांची रहदारी देखील सुरु आहे. दरम्यान एक पोलिस कर्माचरी गाडीवरुन जात असतात. त्यावेळी ते तरुणाला मोबाईल वापरताना पाहतात आणि अचानक त्या तरुणाच्या कानशिलात लगावतात.

तो तरुण अगदी मधोमध फोन घेऊन चालत असतो. अनअपेक्षित कानशिलात पडल्यानंतर तरुणाला चांगलीच वेदना झाली असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान काही लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत पोलिसांवर टिका केली आहे तर काहींनी त्या तरुणावर.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @wilson__thomas या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

काही लोकांनी पोलिसांनी त्यांच्या बळाचा चूकीचा वापर केल्याचे म्हटले आहे. तर काही लोकांनी निशष्काळजीपणे रस्त्या ओलांडणाऱ्या तरुणाला समाजावून सांगायला हवे असे म्हटले आहे. तसेच पोलिसांनी हेल्मेट न घातल्याने देखील त्यांच्यावर टिका केली आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :

सांगलीत पोलीस स्टेशनसमोरच फ्री स्टाईल हाणामारी: नेमका काय प्रकार घडला?

तीन वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडच्या बेस्टफ्रेंडलाच पटवलं, अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का

ऑफिसला जाण्याचा कंटाळा? पुण्यातील ‘हा VIDEO पाहा आणि मिळवा जबरदस्त मोटिव्हेशन!