राज्यासाठी पुढील १२ तास धोक्याचे..!

weather today

राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल झाला आहे. मध्यंतरी विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याचं प्रादेशिक हवामान खात्यानं जाहीर केलं होतं. (weather today) परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पारा अचानक घसरला आहे. रविवारी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. आजही असंच काहीसं वातावरण असणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत कुलाबा, सांताक्रूझ, नाशिक, कोल्हापूर, परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पुढच्या काही तासांमध्ये पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.(weather today)

weather today

पुढच्या १२ तासांमध्ये चक्रीवादळात रुपांतर

गेल्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे रूपांतरण चक्रीवादळात झाले आहे. तसेच उत्तरेकडेसुद्धा वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्याचा परिणाम पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांवर झाला आहे. तर पुढच्या १२ तासांमध्ये या वादळाचं रुपांतर चक्रीवादळात होईल असा इशारा देण्यात आला आहे.

खरंतर, देशातील अनेक राज्यांमध्ये रविवारी वादळी पावसासह गारपिटीचीही हजेरी लागली आहे. यात विदर्भातसुद्धा काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, रविवारी वादळी पावसाची नोंद झाली नाही. तरीसुद्धा नागपूर शहर तसेच अन्य जिल्ह्यांमधील वातावरणात काहीसे बदल जाणवले. त्यामुळे पाऱ्यात किंचित घसरण झाली. विदर्भात अकोल्याखेरीज वाशीम येथे ४१.५, वर्धा येथे ४० आणि चंद्रपूर येथे ४०.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. इतर सर्वच जिल्ह्यांमधील तापमान चाळीस अंशांपेक्षा कमी होते.

हेही वाचा :


IPLच्या निमित्तानं शत्रू होणार एकमेकांचे मित्र? पाहा कोण हे खेळाडू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *