उत्तर प्रदेश: प्रेम आंधळे असते. प्रेमामध्ये सगळे काही माफ असते असे म्हटले जाते. प्रेमामध्ये काही केले जाऊ शकते. अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. एक विवाहित महिला भिकाऱ्यासोबत(beggar) पळून गेली आहे.
सहा मुलांची आई असलेली महिला एक भिकाऱ्यासोबत(beggar) पळून गेली आहे. याविरोधात त्या महिलेच्या नवऱ्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, ते जाणून घेऊयात.
उत्तर पदेशच्या हरदोईमधील ही धक्कादायक घटना घडली आहे. सहा मुलांची आई भिकाऱ्यासोबत पळून गेली आहे. महिला ज्या भिकाऱ्यासोबत पळून गेली तो भिकारी तीच्या घरी भीक मागण्यासाठी येत असे. तसेच तो भिकारी हात पाहून भविष्य देखील सांगत असे. दरम्यान दोघांमध्ये प्रेमाचे सूर जुळले. प्रेम जुळल्याने ती विवाहित महिला आपल्या 6 मुलांना सोडून भिकाऱ्यासोबत पळून गेली आहे. याबाबत महिलेच्या नवऱ्याने तिच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
महिलेच्या नवऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्याची बायको भिकाऱ्यासोबत पळून गेली तेव्हा घरातले पैसे देखील घेऊन पळून गेली असल्याचे समोर येत आहे. तसेच माझ्या पत्नीला लवकरात लवकर शोधून काढावे अशी विनंती नवऱ्याने पोलिसांकडे केली आहे.
मला 6 मुले असून भिकारी माझ्या पत्नीला पळवून घेऊन गेला. हा भिकारी नेहमीच त्यांच्या घरी भीक मागण्यांसाठी येत असे. त्यावेळेस पत्नीचे आणि त्या भिकाऱ्याचे संभाषण होत असे. एके दिवशी पत्नी भाजी आणायला बाजारात गेली ते परत आलीच नाही असे नवऱ्याने तक्रारीत म्हटल्याचे समजते आहे.
हेही वाचा :
पाकिस्तानने ‘या’ देशाला दिली एअरस्ट्राईकची धमकी; म्हटले, गरज पडल्यास हल्ला करू
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या भाविकांसाठी मोठी अपडेट, गाभाऱ्यातील प्राचीन शिळा..’
शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार? तटकरेंची ऑफर काय.., आव्हाडांनी क्लिअरच केलं