छत्रपती संभाजीराजे याचं अत्यंत महत्त्वाच वक्तव्य काय?

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईसह महाराष्ट्रात, देशात आज पाचव्या टप्प्याच मतदान होत आहे (background). या मतदानाआधी छत्रपती संभाजीराजे यांनी एक अत्यंत महत्त्वाच विधान केलय. एकाबाजूला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा आंदोलन सुरु करण्याच्या तयारीत ते आहेत. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यात भरघोस प्रतिसाद मिळाला होता. राज्यातील मराठा समाज भक्कमपणे त्यांच्या पाठिशी असल्याच चित्र दिसलं होतं. सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील. त्यावेळी मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकतात.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (background) संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वाच वक्तव्य केलय. ‘जातीचा मुद्दा करुन पाडापाडी करणं अत्यंत चुकीच आहे’, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ‘गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, यासाठी माझा लढा आहे’ असं ते म्हणाले. “अठरा पगड बार बलुतेदारांच राज्य आहे. आपल्या जातीवर आपलं प्रेम असणं यात काही चुकीच नाहीय. पण याला पाड हा या जीताचा, तो या जातीचा, मी स्वत: या मताचा नाही. मी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे. सगळ्या बहुजन समाजातील लोकांना सोबत घेऊन जाणं माझी जबाबदारी आहे. माझा मराठ्यांसाठी लढा का आहे? गरीब मराठ्यांना न्याय मिळालेला नाही. जो इतर समाजाला मिळाला आहे” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

हेही वाचा :

दोघांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

सत्तेत महायुती की महाविकास आघाडी ?

आंबट-गोड चवीचे औषधी गुणधर्माचे जांभूळ; कोणते आहेत आरोग्यदायी फायदे?