प्लेऑफमध्ये कोण जाणार? नेटकऱ्यांकडून आरसीबीला पसंती!

शनिवारी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्याकडे आयपीएलप्रेमींचं लक्ष(attention) लागलेय. कारण, हा सामना प्लेऑफसाठी निर्णायक ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगतदार लढत होणार आहे.आरसीबी आणि चेन्नईसाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. प्लेऑपमध्ये प्रवेश मिळवण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. सोशल मीडियापासून ते कट्ट्यावर कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार याचीच चर्चा सुरु आहे.

स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने या सामन्याबाबत सोशल मीडियावर पोल घेतला होता. त्यामध्ये नेटकऱ्यांकडून आरसीबीला पसंती दर्शवली आहे. समालोचकांकडून चेन्नईला पसंती दर्शवलण्यात आली तर सोशल मीडियारील पोलमध्ये आरसीबीला पंसती मिळाली आहे. त्यामुळे नक्की कोण जिंकणार, याचे वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत.18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामना सर्वात रोमांचक होणार आहे. या सामन्यावर प्लेऑफचा चौथा संघ ठरणार आहे. याबाबत स्टार स्पोर्ट्सकडून पोल घेण्यात आला होता. त्यामध्ये आरसीबीला सर्वाधिक पसंती मिळाली.

Star Sports social buzz मध्ये नेटकऱ्यांनी आरसीबीला 54.75 टक्के पसंती दर्शवली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सच्या मागे 45.25 टक्के लोकं आहेत. आता 18 मे रोजी काय निकाल लागतो.. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ही बातमी वाचा: 

आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

मोदी तर झोळी घेऊन निघून जातील, 4 जूननंतर तुमचं काय होणार?

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा ‘टॅक्स’संदर्भात मोठा निर्णय