दोघांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

बेदरकारपणे मोटार चालवीत दुचाकीला धडक देवून दोघांच्या मृत्यू (death) झाल्याप्रकरणात आरोपीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमे ही जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्याला काही तासांत जामीन झाला आहे. मात्र अशा प्रकरणात कडक कारवार्इ होण्यासाठी त्या पद्धतीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तरच आरोपीला योग्य ते शासन होवू शकते, असे मत शहरातील वकिलांनी व्यक्त केले

आरोपीला त्वरित जामीन मिळाल्याच्या प्रकाराला सोशल मीडियाचा अंग न देता कायद्याचे निकष काय आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आरोपीवर ज्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे ती सर्व कलमे जामीनपात्र आहेत. त्यामुळे जामीन मिळाला. मोटार वाहन कायद्यातील २०१९ च्या तरतुदीनुसार आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.

– ॲड. डॉ. चिन्मय भोसले

ड्रिंक अँड ड्राईव्हच्या ज्या घटनांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (death) झालेला असेल, तर त्यातील आरोपींवर कलम ३०४ च्या लागू पार्ट दोननुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास आरोपीला १० वर्षांपर्यंत शिक्षा होते. तसेच ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे, अशा गुन्ह्यात अल्पवयीन मुलांवरदेखील इतर आरोपींप्रमाणे कारवार्इ करण्यास परवानगी देण्याचे अधिकार बाल न्याय मंडळाकडे आहेत. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन त्यानुसार अपघातातील आरोपीवर कारवाई होऊ शकते.

– ॲड. प्रतीक राजोपाध्ये

गुन्हा करण्याचा उद्देश होता का? आपण करत असलेल्या कृत्याचे काम परिमाण होवू शकता, यानुसार अशा प्रकरणांत गुन्हा दाखल होत असतो. अल्पवयीन मुलांनी अशा स्वरूपाचा गुन्हा केला तर त्याच्या पालकांवर देखील मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. या प्रकरणात भादवी कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. तसेच गाडीला नंबरप्लेट देखील नव्हती. त्यामुळे ज्या शोरुमधून गाडी घेतली त्यावर देखील कारवाई अपेक्षित आहे.

आरोपीचे वय १८ पेक्षा जास्त असते तर काय झाले असते?

या गुन्ह्यात दाखल करण्यात आलेले सर्व कलम हे जामीनपात्र आहे. त्यामुळे आरोपीचे वय १८ पेक्षा जास्त असते तरीदेखील त्याला जामीन मिळाला असता. फरक फक्त न्यायालयीन प्रक्रियेत पडला असता. अल्पवयीन आरोपीला जामीन मिळण्यासाठी बाल न्यायालयात अर्ज करावा लागतो. तेथेच त्या प्रकरणाची सुनावणी होते. तर आरोपीचे वय १८ पेक्षा जास्त असेल तर त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागतो.

काय आहे कलम ३०४ आणि ३०४ अ

भारतीय दंड संहिता कलम ३०४ (कल्पबल हॅमिसाइड नॉट मर्डर) आणि कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) मध्ये शिक्षेची तरतूद वेगवेगळी आहे. कलम ३०४ मध्ये एकतर मृत्यू (death) घडवून आणण्याचा हेतू किंवा कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे, याची माहिती असणे आवश्यक असते. आरोपीला माहिती असेल की, त्यांच्या कृत्याने कोणाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा तो ते कृत्य करतो व त्यात कोणाचा मृत्यू झाला तर तेथे कलम ३०४ (२) लागू होते. मृत्यू घडवून आणण्याचा कोणताही हेतू नसताना किंवा कोणत्याही कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे, याची माहिती नसताना निष्काळजीपणामुळे झालेला गुन्हा ३०४ अ नुसार दाखल होतो.

भादवी कलम – गुन्हा – शिक्षा काय आहे

२७९ – बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणे कोणत्याही सार्वजनिक मार्गावर वाहन चालवणे – सहा महिन्यांपर्यंत कारावास व दंड किंवा दोन्ही

३०४ – मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेला गुन्हा – जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही

३०४ अ- निष्काळजीपणामुळे किंवा अविचारी कृत्याने मृत्यूला कारणीभूत ठरणे – दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा

३३७ – अविचारीपणे किंवा निष्काळजीपणा करून कोणत्याही व्यक्तीला दुखावणे – सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा

३३८ – अविचारीपणे किंवा निष्काळजीपणा करून एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत करणे – दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही

४२७ – ५० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची नुकसान करणे – दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही

मोटार वाहन कायद्यानुसार दाखल गुन्हा

१८४ – धोकादायकपणे वाहन चालवणे – पाच हजार रुपयापर्यंत दंड आणि एका वर्षापर्यंत कारावास

११९ – वाहतूक चिन्हाचे पालन न करणे – दंडाची शिक्षा

१७७ – वाहतूक नियमाचे, विनियमाचे किंवा अधिसूचनेचे उल्लंघन करणे – पहिल्या गुन्‍ह्यास पाचशे रुपयांपर्यंत दंड असू शकतो, दुसरा किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यास दीड हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.

…म्हणून ‘सकाळ’ने नाव प्रसिद्ध केले नाही

बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ मधील कलम ७४ च्या तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांकडून कोणताही गुन्हा घडल्यास त्यांची ओळख पटेल अशा पद्धतीने कोणतेही कृत्य न करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमांच्या माध्यमातून आरोपींची ओळख स्पष्ट करता येत नाही. त्याचप्रमाणे त्यांचा पत्ता किंवा शाळा अशी कोणतीही वैयक्तीक माहिती उघड करता येत नाही.

बाल न्याय कायदा हा अल्पवयीन मुलांच्या बचावासाठी आहे. या कायद्यानुसार अत्याचार झालेले बालक आणि गुन्हा करणारे बालक यांची ओळख प्रसिद्ध करणे गुन्हा (death) आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी व पीडित मुलांच्या ओळखेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच हा कायदा मुलांच्या अयोग्य वर्तनाचे समर्थन करून त्यांना पाठीशी घालण्यासाठी नाही. आपल्या विरोधी कृत्यामुळे कुणाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या देणे गरजेचे आहे.