लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदा आणि सुनिता घटस्फोट घेणार?

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया (process)अंतिम टप्प्यात आली असल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती आणि त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची एक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आता लग्नाच्या 37 वर्षांनंतर बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार आहे.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या पोस्टनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून (process)बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यासंबंधी अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता त्यांचा खरच घटस्फोट होणार का, याची चर्चा सुरु आहे.

thenowindia या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, अभिनेता गोविंदा आणि सुनिता आहुजा लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेणार आहेत. पोस्ट शेअर करत thenowindia ने म्हटलं आहे की, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा घटस्फोटाच्या अंतिम टप्प्यात असल्याचे अहवाल सांगत आहेत. असा दावा केला जात आहे की गोविंदाचे कोणत्यातरी मराठी (process)अभिनेत्रीसोबतचे अफेअर असून याच प्रकरणी आता घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला असावा. कशाचीही पुष्टी झालेली नसली तरी सोशल मीडियावर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.त्यांच्या अनेक दशकांपासून चाललेल्या वैवाहिक जीवनाचा हा खरोखरच शेवट असू शकतो का?

हेही वाचा :

मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सासऱ्याचा मित्रासोबत मिळून सुनेवर अत्याचार, १५ दिवस खोलीत…

Airtel चा ‘हा’ प्लॅन खरेदी केलेल्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना मिळणार ॲपल टीव्ही+ चा आनंद