शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार…

लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट पाहता राष्ट्रवादी अजित पवार (political) गटातील नेते शरद पवारांकडे परत येणार असल्याची चर्चा आहे. अशातच काल पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या १४ नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात विधानसभा(political) निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटामध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याची चर्चा आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 14 नगरसेवकांनी काल पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा नगरसेवक आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 36 माजी आजी-माजी नगरसेवक शरद पवार गटांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्याचबरोबर चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेही आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे विधानसभा तोंडावर असतानाच शरद पवार पुन्हा एकदा अजित दादांना धक्का देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

शनीच्या वक्री चालीने ‘या’ 4 राशींना मिळणार अपार धन

काल घडले, ते उद्या घडेल? पवार म्हणतात नक्की घडेल!

वर्ल्डकप विजयानंतर विराट कोहलीने पत्नी अन् मुलांना केला व्हिडिओ कॉल