पुणे : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा(political news todays) मागितलं जात आहे. या प्रकरणाची चर्चा ही राज्यभर होताना पाहायला मिळत आहे. अशातचं आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबत महसूल मंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. यात जर मंत्री दोषी असेल तर ते राजीनामा देतील, असं यावेळी बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे म्हणाले की, वस्तूस्थितीवर गेलं पाहिजे. आज धनंजय मुंडे यांचा नाव डायरेक्टली किंवा इनडायरेक्ट तपासामध्ये येत नाही. ज्या दिवशी ते तपासा देतील त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तपास हा मजबूत होत आहे यात आरोपी कोर्टातून सुटणार नाहीत, यासाठी सरकार काम करत आहे. योग्य तपास सुरू आहे.
कोणत्याही प्रकरणात डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तूस्थितीवर बोललं पाहिजे. यात जर मंत्री दोषी असेल तर ते राजीनामा देतील अस यावेळी बावनकुळे म्हणाले. विभागीय आयुक्त पुणे कार्यालय येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
बीड प्रकरणावर भाजप(political news todays) आमदार सुरेश धस हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळत आहे, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारल असता ते म्हणाले की, मी स्वतःहा सुरेश धस यांना भेटलो आहे आणि उद्याही भेटणार आहे. नेमकं या प्रकरणात राजकारण आमच्याकडून किंवा कोणाकडूनही झालं तर तपासाला वेगळं वळण मिळेल.
सर्वांची जबाबदारी आहे की, या प्रकरणांमध्ये जागृत राहील पाहिजे. आरोपीला अंतिम शासन मिळाल पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी एकजूटपणे काम केले पाहिजे. या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. तसेच मला या प्रकरणात कोणावर आरोप करायचा नाही मात्र आरोपीला मदत नाही झाली पाहिजे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले नाही पाहिजे, असं यावेळी बावनकुळे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणारे अनेक लोक परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत बावनकुळे यांना विचारला असता ते म्हणाले की, कुठल्याही नेत्यांना प्रवेश घेताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पक्ष प्रवेश केला जाईल. महायुतीत कुठलाही तणाव निर्माण होणार नाही. महायुती महत्त्वाची आहे नेतृत्वाला विश्वासात घेऊन पक्षप्रवेश घेतला जाईल, असं यावेळी बावनकुळे म्हणाले.
शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर नाराजगी व्यक्त केली आहे याबाबत बावनकुळे यांना विचारला असता ते म्हणाले की, पवार यांनी मान्य केलं बरं झालं काल पर्यंत हे लोक ईव्हीएम आणि मशीनवर दोष द्यायचे त्यांनी थोडा अभ्यास केला आहे. अजून थोडा अभ्यास करायचा गरज आहे. काय चुकलं याचं आकलन केलं तर गाडी परत येऊ शकते. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या चुका झाल्या होत्या.
ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारलो आणि जनतेपर्यंत गेलो जनतेला सांगितलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करू शकतो. आणि जनतेने ते मान्य केलं. आज जनता आमच्यासोबत आहे. महाविकास आघाडी आपापसातल्या वादात पेटली आहे तर महायुती महारष्ट्राचं व्हिजन घेऊन पुढे जात आहे. असं यावेळी बावनकुळे म्हणाले.
चंद्रपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार एकत्रित असून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात विकास करायचा असेल तर पक्षाने विरोधी पक्ष एकत्रित करून विकासाकरता काम केले पाहिजे. महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील जनता महत्त्वाची आहे. हेवेदावे सोडावे लागतील आणि विकासाच्या व्यासपीठावर राजकारण करू नये. सुधीरभाऊ आमचे नेते आहेत. असं यावेळी बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा :
सांगलीत भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; “मी मिनी पाकिस्तानात लढतोय”
कमीत कमी 7500 रूपये पेन्शनसह महागाई भत्ता, बजेटची झोळी उघडणार का निर्मला सीतारमण
‘फटके बसले असतील, म्हणून…’ राऊतांच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य