चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार?

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या आयपीएल 2024मध्ये व्यस्त आहेत. यानंतर टीम इंडिया(champions trophy) जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळणार आहेत. यादरम्यान पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन चर्चा रंगली आहे. याबाबतत भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शह यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे.

आता याच प्रकरणात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं वक्तव्य(champions trophy) समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही याचा निर्णय फक्त भारत सरकार करेल, त्यांचा निर्णय बीसीसीआयला मान्य असेल असं राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत भारत सरकारचा निर्णय अंतिम असेल, सरकारने परवानगी दिली तर टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवलं जाईल असं राजीव शुक्ला यांनी सांगितलं.

चॅम्पियन्स ट्ऱॉफीला अद्याप एक वर्ष बाकी आहे, या वर्षभरात परिस्थिती किती बदलते यावरही भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याचं भवितव्य अवलंबून असल्याचं जय शाह यांनी म्हटलं होतं.

याआधी एशिया कप स्पर्धेदरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान दौरा केला होता. या दौऱ्यात रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात आला होता. नुकतीच भारताचा डेव्हिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. भारतीय टेनिस संघाला पाकिस्तान दौऱ्यासाठी भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलं होतं.

त्यामुळे भारतीय क्रिकेट संघालाही पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. पाकिस्तान दौऱ्यात भारतीय संघ एशिया कप स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत श्रीलंकेने भारताचा 100 धावांनी पराभव केला होता.

हेही वाचा :

16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

‘तुला अधिकार नाहीत…’ करिना कपूर सावत्र मुलाबद्दल असं का म्हणाली?

इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव!