रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह(trophy) यांनी पुष्टी केली आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहली 2025 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळतील. टी20 वर्ल्ड कपमधून निवृत्ती घेतल्यानंतर दोन्ही खेळाडू आता एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

जय शाह यांनी टीम इंडियाच्या(trophy) चांगल्या बेंच स्ट्रेंथवर भर दिला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य व्यक्त केले. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा खेळाडूंची निवड करण्यात आली असली तरी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अनुभवी खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

चॅम्पियन्स ट्ऱॉफी 2025 मध्ये होणार असून पाकिस्तानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं टार्गेट चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की नाही याबाबत अद्यप कोणतीही स्पष्टता नाही. पण पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पर्धेत सीनिअर खेळाडू खेळणार असल्याचं स्पष्ट केलं.

त्यांनी म्हटलंय, ‘टीम इंडियाने आयसीसीची जेतेपद जिंकावीत अशी माझी अपेक्षा आहे. आमच्या कडे चांगला बेंच स्ट्रेंथ आहे. टी20 वर्ल्ड कपमधल्या तीन खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाची प्रगती पाहात आमचं पुढचे टार्गेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन ट्रॉफी असणार आहे’ या दोन्ही स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा टीम इंडियात समावेश असेल असंही जय शाह यांनी स्पष्ट केलंय.

चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार असली तरी, टीम इंडिया तिथे खेळण्यासाठी जाईल की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हायब्रीड मॉडेलवर विचार सुरू असून, टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

हे जाणार दुसऱ्याच्या मांडवात त्यांचा “राज”मंडप रिकामाच!

राजू शेट्टीचा सरकारला इशारा, ‘शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, नाहीतर…’