देशात लवकरच मोठं कांड होणार? PM मोदी नेमके काय म्हणाले?

सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक समाजात तेढ निर्माण(country) करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सोशल मीडियाचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करतो. विरोधक मात्र त्यातून समाजात फूट पाडत आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर केला. लोकांनी अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. खोट्या व्हिडिओची माहिती पोलिसांना द्यावी. नाहीतर येणाऱ्या काळात देशात एखादे मोठे कांड होण्याची शक्यता असल्याची भीती मोदींनी व्यक्त केली. याबाबत निवडणूक आयोगाला लक्ष देण्याची विनंती करणार असल्याचेही मोदींनी सांगितले.

साताऱ्यातील कराड (country)येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा पार पडली. या वेळी त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मी तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी करतो. त्यातून मी तुमच्याशी संवाद साधतो. तुमच्यापर्यंत पोहाेचून गरजा जाणून घेतो. त्यातून योजनांची माहिती देतो, असे सांगून विरोधक मात्र समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असल्याचा आरोप मोदींनी केला.

विरोधकांकडून मात्र फेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्या व्हिडिओत माझा, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आवाज असतो. ते व्हिडिओ एआयच्या माध्यमातून तयार केले जातात. आमच्या तोंडात नको ते विधाने टाकले जात आहेत. त्यांना माहिती आहे की शांततापूर्ण निवडणूक होते, तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही. त्यामुळे येणाऱ्या महिनाभरात काही ना काही मोठे कांड होण्याची शक्यता आहे. त्यातून विरोधक आपले इरादे पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप मोदींनी केला.

देशात लवकरच मोठं कांड होणार? PM मोदी नेमके काय म्हणाले?

विरोधकांचा हा समाजात तेढ निर्माण करण्याचे इरादे मोडून काढण्यासाठी लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही मोदींनी केले. ते म्हणाले, लोकशाहीच्या भल्यासाठी, देशातील एकतेसाठी असे खोटे व्हिडिओ आले तर ते पुढे पाठवू नका. त्याबाबत पोलिसांना कल्पना द्या. असे व्हिडिओ पुढे पाठवले तर त्याविरोधातील कायदा कडक करण्यात आला आहे. आता त्यांच्यावर निवडणूक आयोगानेही लक्ष द्यावे, अशी विनंती करणार असल्याचेही मोदींनी या वेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

हातकणंगले लढाई सोपी नाही…धैर्यशील मानेंच्या गावातच मत विभाजन

कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले…

“इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं”; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा