पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यापासून ‘हे’ शेतकरी राहणार वंचित?

केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी(farmers) अनेक योजना राबवत असतात. अशातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची आर्थिक मदत केंद्र सरकारद्वारे केली जाते.

अशातच या योजनेचे एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांच्या(farmers) खात्यावर जमा झाले आहेत. आहे. तर आता शेतकर्‍यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. अशातच सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. या नवीन गाईडलाईन्समुळे काही शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

कोणत्या शेतकर्‍यांना बसणार फटका? :
– जे शेतकरी अल्पभूधारक असतील तर त्यांना पडताळणी प्रक्रिया पूर्ण कारवाई लागणार आहे. तसेच जिल्हा कृषी कार्यालयाकडून किंवा भूमी अभिलेखाकडून याची पडताळणी करून घ्या, अन्यथा या योजनेचा 19 वा हप्ता मिळणार नाही.

– याशिवाय या योजनेचा अर्ज भरताना तुम्ही काही चूक केली असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही.

– तसेच बँक खात्याशी आधारकार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा 19 वा हप्ता मिळणार नाही.

या योजनेसंदर्भात तक्रार असल्यास ‘या’ नंबरवर करा संपर्क :
पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606

हेही वाचा :

महाराष्ट्राला दोन ‘वंदे भारत’ स्लीपर मिळणार

गांधीजींनी कधीही टोपी घातली नाही, पण…PM मोदींनी दिली यशस्वी राजकारणी होण्याची गुरूकिल्ली

टाटा ग्रुपच्या टीसीएसच्या शेअर्समध्ये झेप