नवऱ्याला अंधारात ठेवून स्त्रियांनी हे काम करावं

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रख्यात लेखिका (founder)सुधा मूर्ती यांची नवी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेकवेळा ते लोकांशी संवाद साधत, अनुभव शेअर करत असतात. सुधा मूर्ती यांचे लेखन सर्वांनाच परिचित आहे. इन्फोसिस कंपनी सुरू करणारे नारायण मूर्ती यांना त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांची भक्कम साथ मिळाली, म्हणूनच ते एवढा मोठा पल्ला गाठू शकले. ही आयटी कंपनी भारतात आणण्याचे जेवढे श्रेय नारायण मूर्ती यांना दिले जाते तेवढेच श्रेय त्यांची पत्नी, सुधा मूर्ती यांनाही आहे.

असं का व्हावं ? याचं उत्तर सुधा मूर्ती यांनी स्वतः दिले होते. काही काळापूर्वी त्या कपिल शर्माच्या शोमध्ये आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांचे पती कंपनी सुरू करण्याचा विचार करत होते, तेव्हा त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यानंतर सुधा मूर्ती यांनी त्यांना घरखर्चातून वाचवलेल्या पैशातून मदत केली.

तो अनुभव शेअर करताना सुधा मूर्ती यांनी प्रेक्षकांमध्ये (founder)बसलेल्या महिलांना एक सल्ला दिला. प्रत्येक महिलेने आपल्या पतीपासून लपवून किंवा पतीला न सांगता पैशांची बचत करावी असे आवाहन सुधा मूर्ती यांनी केले.

लपवून बचत करणं गरजेचं का असतं यावर त्यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, तुम्ही तुमच्या बचतीबद्दल कोणालाही सांगू नका. असं केलं तर ते पैसे लवकर खर्च होण्याची शक्यता असते. विशेषत: जेव्हा पुरुषांना माहित असते की घरात पैसा आहे, तेव्हा ते खर्च करण्यासाठी खूप उत्सुक असतात.


पुढे बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या की, (founder)आपल्या पतीला आर्थिक मदत करण्यासाठी प्रत्येक महिलेने नोकरीच केली पाहिजे, असं काही आवश्यक नाही. ज्या स्त्रिया घरी आहेत, त्याही आपल्या बुद्धीचा वापर करून घर चालवण्यासाठी दिलेले पैसे वाचवू शकतात. आणि गरज पडल्यास या पैशातून त्या आपल्या पतीला आधार देऊ शकता
कमी उत्पन्न असतानाही पैसे वाचवण्याचे कौशल्य केवळ कुशल स्त्रीकडेच असते. अशा महिलांना त्यांच्या पतीकडून खूप आदर मिळतो, असे त्यांनी नमूद केले

हेही वाचा :

नदीच्या प्रवाहाशी झुंज! तरुणाच्या शोधार्थ जीवघेण्या 48 तासांची शोधमोहीम

शरद पवारांचे आरोप: सरकारच्या योजना फसव्या आणि लागू होण्याबाबत शंका

सांगली जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी 260 अतिरिक्त बस सेवा!

कोल्हापुर दोन तरण्याबांड मुलांच्या अकाली मृत्यूनंतर आईनं पाचव्या दिवशी अखेरचं श्वास